बलात्कारासारखे गंभीर गुन्हे 'कॉप्रमाईज' करण्याचा सपाटा, भाजपचा घणाघात

बलात्कारासारखे गंभीर गुन्हे 'कॉप्रमाईज' करण्याचा सपाटा, भाजपचा घणाघात

गृहमंत्र्यांच्या काठीत दम राहिला नाही, अशा शब्दांत आमदार सुरेश धस यांनी केला आहे.

  • Share this:

बीड,17 फेब्रुवारी: महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुलीवर अत्याचार होत आहेत. मात्र, गुन्हे दाखल केले जात नाहीत तर गंभीर प्रकरणातील गुन्हे कॉमप्रमाईज करण्याचा सपाटा राज्य सरकारने लावला आहे, असा खळबळजनक आरोप भाजपचे आमदार आणि माजी मंत्री सुरेश धस यांनी केला आहे.गृहमंत्र्यांच्या काठीत दम राहिला नाही, अशा शब्दांत आमदार सुरेश धस यांनी केला आहे.

आमदार सुरेश धस म्हणाले, सरकारच्या गृहमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यायला हवा. असे मंत्री महाराष्ट्राला नको आहेत. त्यांचा राजीनामा घ्यावा व दुसरे गृहमंत्री नेमावे, अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे.

अचानक इतक्या घटना घडत आहेत. फक्त पोलिस तपास सुरु असल्याचे सांगितले जात आहे. राज्य सरकार मागच्या अधिवेशनात गप्पा मारत होते. आठ दिवसात आरोपीला फाशी देणार, असं सांगण्यात आलं होतं. त्याचं काय झालं. सरकार केवळ गप्पा मारत होते. ऑर्डिनन्स का काढत नाहीत. पोलिसांचा धाक राहिला नाही, वचक राहीला नाही. भूतकाळातील घटनांना बाबतीत फक्त चर्चा करत आहेत. आज घडणाऱ्या हिंगणघाट, औरंगाबाद आणि लासलगाव जळीत कांडाच्या घटनांमध्ये सरकार काही का? करत नाही. कायदाचा जरब राहिला नाही.

आष्टी तालुक्यातील एका मुलीवर अत्याचार झाल्यावर शिक्रापूरच्या पोलिस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेली तर दखल सुद्धा घेतली नाही. गुन्हा दाखला करुन घेतला नाही. म्हणून त्या पीडितेने गळफास घेवून जीवन संपवले. या सरकारने गंभीर गुन्ह्यांसारख्या प्रकरणात कॉप्रमाईज करण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे सरकारच्या गृहमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यायला हवा, असा मंत्री महाराष्ट्राला नकोय, अशी घणाघाती टीका सुरेश धस यांनी केली आहे.

वारकरी संप्रदाय संपवण्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रयत्न

दरम्यान, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय संपवण्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात येत आहे. प्रसिध्द कीर्तनकार इंदुरीकर महाराजांना विरोध म्हणजे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय संपवण्याचा राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचा डाव असल्याची घणाघाती आरोप भाजपचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केला आहे. राम कुलकर्णी अंबेजोगाईत बोलत होते.

धर्मनिरपेक्ष, पुरागामी विचाराचा आडून कीर्तन परंपरा धोक्यात आणण्याचा डाव काही लोक, शक्ती करत असून इंदुरीकर महाराज हे प्रबोधनकार आहेत. त्यांच्यामुळे अनेकांनी दारु सोडली तर आई-वडिलांची सेवा लोक करू लागले आहेत. इंदुरीकर महाराज जे बोलले त्याला धार्मिक ग्रंथाचा, गुरुचरित्राचा आधार असल्याचे राम कुलकर्णी म्हणाले, तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसवर सडकून टीका केली.

First published: February 17, 2020, 2:31 PM IST

ताज्या बातम्या