मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'राज्याला आणखी 23 मंत्री मिळतील', शिंदे गटातील नेमकी कुणाकुणाची वर्णी लागणार?

'राज्याला आणखी 23 मंत्री मिळतील', शिंदे गटातील नेमकी कुणाकुणाची वर्णी लागणार?

पुढच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या टप्प्यात नेमकं कुणाकुणाला संधी मिळणार, याबाबतही भाष्य करण्यात आलेलं नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराच्या दुसऱ्या टप्प्याबाबत उत्सुकता वाढली आहे.

पुढच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या टप्प्यात नेमकं कुणाकुणाला संधी मिळणार, याबाबतही भाष्य करण्यात आलेलं नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराच्या दुसऱ्या टप्प्याबाबत उत्सुकता वाढली आहे.

पुढच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या टप्प्यात नेमकं कुणाकुणाला संधी मिळणार, याबाबतही भाष्य करण्यात आलेलं नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराच्या दुसऱ्या टप्प्याबाबत उत्सुकता वाढली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Chetan Patil

मुंबई, 1 सप्टेंबर : राज्य मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तार अद्याप झालेला नाही. राज्य सरकारकडून दुसऱ्या टप्प्यातील विस्तार कधी होईल? याबाबत स्पष्ट तारीख सांगण्यात येत नाहीय. पुढच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या टप्प्यात नेमकं कुणाकुणाला संधी मिळणार, याबाबतही भाष्य करण्यात आलेलं नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराच्या दुसऱ्या टप्प्याबाबत उत्सुकता वाढली आहे. विशेष म्हणजे मंत्रिमंडळाच्या विस्तारावरुन विरोधकांकडून वारंवार टीका करण्यात येत आहे. त्यामुळे राज्य सरकार मंत्रिमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा लवकर जाहीर करेल, अशी आशा बाळागली जात आहे. या दरम्यान भाजप नेते मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

"महाराष्ट्रात 288 विधानसभा सदस्य आहेत. त्यानुसार 43 मंत्री होतात. 43 पैकी आता या क्षणाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री धरुन भाजप आणि शिवसेनेचे प्रत्येकी नऊ असे एकूण 20 मंत्री आहेत. नवे 23 मंत्री आणखी भविष्यात होतील. येणाऱ्या काही दिवसांत निश्चितच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. या विस्तारात शिवसेना आणि भाजपच्या अनेक आमदारांना जनतेची सेवा करण्याची संधी प्राप्त होईल", असं सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केलं आहे.

(पुणे महापालिकेचं विभाजन होणार? मंत्री चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान)

"शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी एकाही जिल्ह्याला पालकमंत्री नाही. त्यामुळे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार ऑक्टोबरमध्ये (दिवाळीपूर्वी) होईल. 288 आमदारांच्या 15 टक्केच मंत्री होऊ शकतात. त्यामुळे मंत्र्यांची संख्या 43 एवढीच असेल, असे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार स्पष्ट केले. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये 26 कॅबिनेट आणि 17 राज्यमंत्री असतील. दुसऱ्या टप्प्यात सात कॅबिनेट तर 17 राज्यमंत्र्यांचा विस्तार होणार आहे", अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

शिंदे गटातील कुणा-कुणाला मंत्रिपद मिळणार?

राज्य मंत्रिमंडळाच्या पुढच्या टप्प्यात शिंदे गटातील कोणकोणत्या आमदाराला मंत्रिपद मिळतं हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. अनेक आमदार हे मंत्रिपदासाठीच शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्यामुळ शिंदे गटात मंत्रिपद मिळाल्यानंतर कुणी नाराज होतं का? मंत्रिमंडळ विस्तारानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी काही वेगळं चित्र निर्माण होतं का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First published:

Tags: Maharashtra politics, Sudhir mungantiwar