'काकांनी डाव टाकला आणि...', सुधीर मुनगंटीवारांचा अजित पवारांवर घणाघाती हल्ला

'काकांनी आपला डाव टाकला म्हणून त्यांना सत्तेचा ताम्रपट आमच्याकडून घेवून शिवसेनेकडे जावं लागलं.'

'काकांनी आपला डाव टाकला म्हणून त्यांना सत्तेचा ताम्रपट आमच्याकडून घेवून शिवसेनेकडे जावं लागलं.'

  • Share this:
    हैदर शेख, चंद्रपूर, 16 फेब्रुवारी : राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या टीकेला भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 'सत्तेचा ताम्रपट हातातून जाऊ नये म्हणून अजितदादा भाजप सोबत आले होते. काही लोकं सत्तेत चिरंजीव होऊ पाहतात. सत्तेचा ताम्रपट आपल्याच कडे रहावा यासाठी प्रयत्न करतात, पक्ष मग कुठलाही असो. यासाठी अजित दादा प्रयत्न करत होते,' असा गंभीर आरोप मुनगंटीवार यांनी केला आहे. 'काकांनी आपला डाव टाकला म्हणून त्यांना सत्तेचा ताम्रपट आमच्याकडून घेवून शिवसेनेकडे जावं लागलं,' असा खोचक टोला लगावात सुधीर मुनगंटीवार यांनी काही काळासाठी अजित पवारांनी भाजपसोबत स्थापन केलेल्या सत्तेवरून निशाणा साधला आहे. 'आम्ही सत्ता फक्त जनतेसाठी वापरली', असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले. भाजपच्या प्रदेश अधिवेशनाबाबत सुधीर मुनगंटीवार यांच्या अनुपस्थिती बाबत केला खुलासा 'मी प्रदेशाध्यक्षांच्या रेस मध्ये कधीच नव्हतो. प्रादेशिक संतुलन हे राजकीय पक्षाला राखावे लागते त्यामुळे मी शर्यतीत नव्हतोच. 14 फेब्रुवारी रोजी आम्ही दिल्लीत सर्व एकत्र होतो. केवळ महत्वाच्या 3 महिने आधी ठरलेल्या भेटींमुळे मला मुंबईत अधिवेशनादरम्यान उपस्थित राहता आले नाही. याबाबत कुठलेही अन्य कारण नाही,' असा खुलासा सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. महाराष्ट्रात भाजपने दिले स्वबळाचे संकेत, भाजप अध्यक्षांनी केली मोठी घोषणा 'भाजप अधिवेशन सुरू असण्याच्या काळात माझ्या काही पूर्वनियोजित बैठका व भेटी असल्याने मी अनुमती घेऊनच मतदारसंघात आहे. हा पक्ष आमचा आत्मा आहे. त्यामुळे पक्षाबाबत नाराज असण्याचे कारण नाही,' असंही मुनगंटीवार म्हणाले.
    First published: