पैसे दुप्पट करून देण्याचं आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक, भाजप अध्यक्षाला घेतलं ताब्यात

पैसे दुप्पट करून देण्याचं आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक, भाजप अध्यक्षाला घेतलं ताब्यात

पैसे दुप्पट करून देण्याचा आमिष दाखवून अनेक महिलांना कोट्यवधींचा चुना लावून त्यांची आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Share this:

कल्याण, 19 डिसेंबर: पैसे दुप्पट करून देण्याचा आमिष दाखवून अनेक महिलांना कोट्यवधींचा चुना लावून त्यांची आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी कल्याण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून भाजपच्या महिला अध्यक्षा रेखा जाधव (BJP Women President Rekha Jadhav) यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

रेखा जाधव यांनी 18 महिन्यात पैसे दुप्पट करून दिल्याचं काही महिलांना आमिष दाखवलं होतं. या प्रकरणी आता रेखा जाधव यांच्यासह चार जणांविरुगद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा..मुंबईतील या 6 वर्षीय मुलीने जे केलं ते कळाल्यावर तुम्हीही तिला सलाम कराल!

या संदर्भात 'एबीपी माझा'नं दिलेल्या वृत्तानुसार, कल्याणमधील गौरीपाडा परिसरात रहिवासी चंद्रप्रभा ढगले यांनी या प्रकरणी कल्याण शहरातील महात्मा फुले पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. 18 महिन्यात पैसे दामदुप्पट करून देण्याचा आमिष दाखवून रेखा जाधव यांच्यासह त्यांच्या साथिदारांनी आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप या महिलेनं केला आहे. या प्रकरणी श्रीकांत राव, संदीप सानप, रेखा जाधव आणि सुनील आव्हाड या चौघांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेखा जाधव यांच्या साथिदारांनी काही महिलांकडून एक कोटी 70 लाख रुपयांना चूना लावला. मात्र, मुदत पूर्ण झाल्यानंतर महिलांनी रेखा जाधव यांनी पैशाची मागणी केली असता. त्या उडवा उडवीची उत्तर देत होत्या. अखेर या प्रकरणात

हेही वाचा...मुंबई, ठाण्यासह कोकणात गारठा वाढणार, उत्तर भारतात थंडीची लाट

दरम्यान, तब्बल पाच वर्षांपासून हे प्रकरण प्रलंबित होतं. महिलांनी याबाबत माझ्याकडे कैफियत मांडली होती. त्यानुसार गृहमंत्र्याकडे या प्रकरणी पाठपुरावा केल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी सांगितलं. भाजप नेत्याकडून सर्वसामान्यांची आर्थिक लूट केली जात आहे, ही बाब अत्यंत दुर्दैवी असल्याचं विकास लवांडे यांनी सांगितलं आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: December 19, 2020, 7:58 AM IST
Tags:

ताज्या बातम्या