बारामतीतून अजित पवारांना पराभूत करण्यासाठी भाजपचा प्लॅन, ‘या’ मंत्र्याने घेतली पहिली बैठक

रामतीतून अजित पवारांना अडचणीत आणण्यासाठी भाजपने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मदतीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 29, 2019 09:00 AM IST

बारामतीतून अजित पवारांना पराभूत करण्यासाठी भाजपचा प्लॅन, ‘या’ मंत्र्याने घेतली पहिली बैठक

मुंबई, 29 ऑगस्ट : महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जवळ आल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या गोटात जोरदार हालचाली सुरू आहेत. विधानसभा निवडणूक जिंकत पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी भाजप-शिवसेनेचा प्रयत्न असणार आहे. यासाठीच्या रणनीतीचा भाग म्हणून राष्ट्रवादीच्या नेतृत्वालाच लक्ष्य करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. बारामतीतून अजित पवारांना अडचणीत आणण्यासाठी भाजपने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मदतीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

लोकसभा निवडणुकीतही भाजपने बारामती मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केलं होतं. मात्र या निवडणुकीत पवार पॉवरसमोर भाजपचा निभाव लागला नाही. राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या कांचन कुल यांचा जवळपास दीड लाख मतांनी पराभव केला. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरुद्ध भाजपकडून रणनीती आखली जात आहे.

RSS आणि भाजपच्या मंत्र्याची पहिली बैठक

विधानसभा निवडणुकीत पवरांचा गड असलेली बारामती कशी जिंकता येईल, याबाबतची व्यूवरचना आखण्यासाठी रायगडचे पालकमंत्री आणि राज्यमंत्री असलेल्या रवींद्र चव्हाण यांनी आरएसएसचे पदाधिकारी आणि भाजपचे स्थानिक नेते यांच्यासोबत बैठक घेतली. याबाबतत ‘टीव्ही 9’ने वृत्त दिलं आहे.

बारामतीत असलेलं अजित पवार यांचं काम आणि दांडगा जनसंपर्क यामुळे हा मतदारसंघ काबीज करणं भाजपसाठी मोठं आव्हान आहे. त्यामुळेच भाजपकडून या मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी आरएसएसचीही मदत घेतली जात आहे. त्यामुळे आगामी काळात बालेकिल्ला बारामतीत भाजपकडून पवारांना शह देणार की पवार पॉवर पुन्ह एकदा भाजपला अस्मान दाखवणार, हे पाहावं लागेल.

Loading...

VIDEO: वॉशिंग मशीन आणि निरमाच्या भाजप कनेक्शनवर रावसाहेब दानवे म्हणतात...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 29, 2019 08:54 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...