मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'तुम्ही चोऱ्या केल्या नसत्या तर धाडी पडल्या नसत्या', रावसाहेब दानवेंचा पवारांना टोला

'तुम्ही चोऱ्या केल्या नसत्या तर धाडी पडल्या नसत्या', रावसाहेब दानवेंचा पवारांना टोला


'आता धाडी पडल्या आहे. यात कुणा कुणाची नावं आहे, हे तुम्हाला माहिती आहे. धाडी पडल्यामुळे कसं थरथर घाबरायला लागले आहे.

'आता धाडी पडल्या आहे. यात कुणा कुणाची नावं आहे, हे तुम्हाला माहिती आहे. धाडी पडल्यामुळे कसं थरथर घाबरायला लागले आहे.

'आता धाडी पडल्या आहे. यात कुणा कुणाची नावं आहे, हे तुम्हाला माहिती आहे. धाडी पडल्यामुळे कसं थरथर घाबरायला लागले आहे.

नांदेड, 08 ऑक्टोबर : राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहिणीसह (Income Tax raid on Ajit Pawar sister office) मुलगा पार्थ पवार (parth pawar) यांच्यावर इन्कम टॅक्स विभागाने कारवाई केल्यामुळे खळबळ उडाली आहे. 'आम्ही धाडी टाकयाला लावल्या असं काँग्रेस ,राष्ट्रवादीचे नेते सांगत आहेत. तुम्ही चोऱ्या केल्या नसत्या तर आम्ही धाडी टाकल्या असत्या का? असा सवाल करत  केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (raosaheb danve) यांनी टीका केली.

देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपा उमेदवार सुभाष साबणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. त्यानंतर आयोजित जाहीर सभेत  रावसाहेब दानवे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.

'आता धाडी पडल्या आहे. यात कुणा कुणाची नावं आहे, हे तुम्हाला माहिती आहे. धाडी पडल्यामुळे कसं थरथर घाबरायला लागले आहे. शरद पवार म्हणाले लखीमपूरमधील घटनेवर टीका केली म्हणून माझ्या अजित पवारांवर कारवाई करण्यात आली. जयंत पाटील म्हणाले आता होऊन जाऊ द्या एकदा, भाजप आणि राष्ट्रवादीसोबत, मग आम्ही ही म्हणतो एकटे एकटे या मग होऊन जाऊ द्या एकदाच, असा टोलाही दानवेंनी लगावला.

अरेरे! आता साधी चड्डीही मिळेना; सुटाबुटात राहणाऱ्या इंग्रजांवर ओढावली अशी वेळ

'राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या बहिण आणि मुलावर धाड टाकण्यात आली आहे, अजूनही चौकशी सुरू आहे. पण आम्ही धाडी टाकायला लावल्या असं काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते सांगत आहेत. पण तुम्ही चोऱ्या केल्या नसत्या तर आम्ही धाडी टाकल्या असत्या का? असा सवाल दानवेंनी उपस्थितीत केला.

क्या बात है ! एकाच रोपाला आता येणार टोमॅटो अन् वांगी

तसंच, 'हे सरकार बेईमानी करून आले आहे. शिवसेना आणि भाजप युती होती. पण, सेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. आमच्याकडे सर्वात जास्त जागा आहे.  तुमच्यात दम असेल तर एकट-एकट येऊन आमच्याशी लढा, असं आव्हानच रावसाहेब दानवे यांनी दिलं.

दरम्यान, भाजप नेते आशिष शेलार यांनी देखील इन्कम टॅक्सच्या धाडीवरून कॉंग्रेस नेत्यांवर टीका केली. 'धाडीत ज्याची नावे आहेत ते काँग्रेस, राष्ट्रवादी, सेनेचे समर्थक असल्याची टीका आशिष शेलार यांनी केली.

First published: