मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

''मोर्चा काढण्याची नौटंकी ताबडतोब बंद करावी'' राम कदम यांचा काँग्रेसला पुन्हा इशारा

''मोर्चा काढण्याची नौटंकी ताबडतोब बंद करावी'' राम कदम यांचा काँग्रेसला पुन्हा इशारा

कॉंग्रेस पक्षांच्या नेत्यांनी भाजप नेत्यांच्या घरी अथवा कार्यालयात मोर्चा काढण्याची नौटंकी ताबडतोब बंद करावी, असा इशारा भाजप नेते राम कदम (BJP leader Ram Kadam) यांनी काँग्रेसला दिला आहे.

कॉंग्रेस पक्षांच्या नेत्यांनी भाजप नेत्यांच्या घरी अथवा कार्यालयात मोर्चा काढण्याची नौटंकी ताबडतोब बंद करावी, असा इशारा भाजप नेते राम कदम (BJP leader Ram Kadam) यांनी काँग्रेसला दिला आहे.

कॉंग्रेस पक्षांच्या नेत्यांनी भाजप नेत्यांच्या घरी अथवा कार्यालयात मोर्चा काढण्याची नौटंकी ताबडतोब बंद करावी, असा इशारा भाजप नेते राम कदम (BJP leader Ram Kadam) यांनी काँग्रेसला दिला आहे.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 21 फेब्रुवारी: कॉंग्रेस पक्षांच्या नेत्यांनी भाजप नेत्यांच्या घरी अथवा कार्यालयात मोर्चा काढण्याची नौटंकी ताबडतोब बंद करावी, असा इशारा भाजप नेते राम कदम (BJP leader Ram Kadam) यांनी काँग्रेसला दिला आहे. मुंबईच्या आगामी महापालिका निवडणुकीच्या (BMC Elections 2022) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुंबईच्या कांदिवलीत नुकतंच काल एका तलावाच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमावेळी शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) कार्यकर्ते आमनेसामने आले होते. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती. याशिवाय काँग्रेसने काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या 'सागर' या शासकीय निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं होतं. त्यावेळीदेखील भाजप-काँग्रेस (BJP-Congress) आमनेसामने येणार, असं वातावरण तयार झालं होतं. पण सुदैवाने पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली. आता पुन्हा तशीच काहीशी घटना घडण्याची शक्यता आहे. काल भाजप नेते राम कदम (BJP leader Ram Kadam) यांनी याबाबत सूचक विधान केलं. त्यानंतर आजही त्यांनी नवं ट्विट करुन काँग्रेसला इशारा दिला आहे.

राम कदम यांचं कालचं ट्विट

"अशी माहिती मिळतेय की काँग्रेस आमचे खासदार मनोज कोटक यांच्या कार्यालयावर उद्या सकाळी मोर्चा काढण्याचा प्रयत्न करणार आहे. याद राखा ! तुम्हाला जशास तसे उत्तर दिले जाईल. जरूर या! आमच्या कार्यकर्त्यांनी तुमच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे", असा इशारा राम कदम यांनी ट्विटरवर दिला.

राम कदम यांचं आजचं ट्विट

कॉंग्रेस पक्षांच्या नेत्यांनी भाजपा नेत्याच्या घरी अथवा कार्यालयात मोर्चा काढण्याची नौटंकी ताबडतोब बंद करावी...नाही तर आम्हालाही सरकारच्या काँग्रेससहित सर्व मंत्र्यांना घेराव घालून प्रत्त्युत्तर द्यावे लागेल. आज खासदार मनोज कोटक यांच्या कार्यालयात यायची हिंमत कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी करू नये. अन्यथा याही अगोदर कॉंग्रेस वाले तोंड घशी पडलेत. आज तर... पाहाच

मुंबईत काँग्रेस आणि भाजप यांच्यातील संघर्षाची पहिली वेळ नाही. काही दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्याबाहेर आंदोलन करण्यात आलं होतं. त्यावेळी भाजपकडून काँग्रेसला प्रत्युत्तर दिलं जाईल, कार्यकर्ते तयार असल्याचा इशारा देण्यात आला होता. पण त्यावेळी पोलिसांनी फडणवीसांच्या बंगल्याकडे जाणारे दोन्ही मार्ग बंद केले होते. याशिवाय पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं. त्यावेळी वाहतूक कोंडी आणि इतर कारणांमुळे काँग्रेसने आंदोलन मागे घेतलं होतं. पण तसं आंदोलन राज्यभरात केलं जाईल, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे.

First published:

Tags: Ram kadam, काँग्रेस