मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /राम कदमांना सगळं माहीत, नार्को टेस्ट करा; काँग्रेसनं मागणी करत केले गंभीर आरोप

राम कदमांना सगळं माहीत, नार्को टेस्ट करा; काँग्रेसनं मागणी करत केले गंभीर आरोप

कंगना+भाजप IT सेल” कंगनाच्या ट्वीट, वक्तव्यांमागे भाजप आहे.

कंगना+भाजप IT सेल” कंगनाच्या ट्वीट, वक्तव्यांमागे भाजप आहे.

कंगना+भाजप IT सेल” कंगनाच्या ट्वीट, वक्तव्यांमागे भाजप आहे.

मुंबई, 4 सप्टेंबर: बॉलिवूड अभितेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणावरून अभिनेत्री कंगणा रणौत हिनं मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप करत त्यांच्यावर अविश्वास दाखवला. तिच्यावर शिवसेनेने निशाणाही साधला आहे. नंतर मात्र कंगणाच्या सूरात सूर मिसळून भाजपचे नेते राम कदम यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. राम कदम यांच्या या टिकेवर आता काँग्रेसनं पलटवार केला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांना राम कदम यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी कली आहे.

हेही वाचा...पिंपरी-चिंचवडमध्ये अमानुषतेचा कळस, छातीवर अगरबत्तीचे चटके देत केला बलात्कार

सचिन सावंत यांनी ट्वीट करून कंगणासह राम कदम यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सावंत म्हणाले की, 'कंगना+भाजप IT सेल” कंगनाच्या ट्वीट, वक्तव्यांमागे भाजप आहे. या कृतघ्न महिलेच्या साथीनं राम कदम यांनी महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेचा, संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील 106 हुतात्म्यांचा, राणी लक्ष्मीबाईंचा व आमची मुंबईवर प्रेम करणाऱ्या या सर्वांचा घोर अपमान केला आहे. महाराष्ट्र ही शिवरायांची भूमी आहे. महाराष्ट्राचा सातत्याने जाणिवपूर्वक अपमान भाजप करत आहे. अजूनही भाजपाने कंगनाचा निषेध केला नाही. कंगना व राम कदम यांचे बोलविते धनी असलेल्या देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्रद्रोही भाजपने विनाशर्त महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी ही आमची मागणी आहे, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे.

आणखी काय म्हणाले सचिन सावंत?

विवेक मोईत्रा यांच्यापासून राम कदम यांना ड्रग्स विक्री तसेच पुरवठ्याबाबत सर्व माहीत आहे. एवढं नाही तर कदम यांचे बॉलिवूडमधील इतरांशी जवळचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांची नार्को टेस्ट करावी. भाजप कार्यालयात संदीप सिंग यानं तब्बल 53 वेळा कोणाशी संवाद साधला याबाबत चौकशी व्हायला हवी. यातून भाजप नेते आणि ड्रग्स माफियांचे संबंध उघड होतील, असं देखील सचिन सावंत यांनी सांगितलं आहे.

संजय राऊत यांच्या टीकेनंतर कंगनाचा सवाल

दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर अनेक वक्तव्यांमुळे अभिनेत्री कंगना रणौत चर्चेत आली आहे. तिनं ट्विटरवरून देखील विविध व्यक्तींवर टीका करण्याची संधी सोडली नाही आहे. दरम्यान कंगनाने नुकतेच ट्वीट करत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. तिने या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, 'शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला जाहीरपणे धमकी दिली आहे आणि मुंबईत न परतण्यास सांगितले आहे. आधी मुबंईच्या रस्त्यावर आझादी ग्राफिटीज आणि आता जाहीर धमकी मिळते आहे. ही मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटत आहे?'

शिवसेना नेता संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र सामनातून असे म्हटले होते, त्या मुंबईत राहतात आणि तरीदेखील इथल्या पोलिसांवर टीका करतात. त्यांनी असे म्हटले होते की, 'मी त्यांना (कंगनाला) नम्र विनंती करतो की त्यांनी मुंबईत येऊ नये. हे मुंबई पोलिसांचा अपमान करण्याव्यतिरिक्त काही नाही आहे. गृह मंत्रालयाला यावर कारवाई करायला हवी'.

कंगनाने काही दिवसांपूर्वी मुंबई पोलीस कमिशनर आणि मुंबई पोलिसांच्या कामकाजावर सवाल उपस्थित केले होते. तिने असा आरोप देखील केला होता की, CP मुंबई पोलिसांनी कंगनाबाबत चुकीचे वक्तव्य करणाऱ्याचे ट्वीट लाइक केले आहे. कंगनाचे याबाबत मुंबई पोलिसांबरोबर ट्वीटवॉर झाल्याचे देखील पाहायला मिळाले होते.

हेही वाचा...ड्रग्ज तस्करी प्रकरणी प्रसिद्ध साऊथ अभिनेत्रीच्या घरात CCB ची छापेमारी

गेले काही दिवस कंगना अनेक आक्रमक ट्वीट करत आहे. तिने काही कलाकारांच्या ड्रग टेस्टची मागणी केली होती. तर करण जोहर (Karan Johar) वर देखील तिखट शब्दात टीका केली आहे. कंगनाने करण जोहरला मूव्ही माफियांचा मुख्य गुन्हेगार म्हटले आहे. तिने पुढे म्हटलं आहे की, '@PMOIndia इतक्या सर्व जणांचे करिअर आणि आयुष्य संपवल्यानंतरही तो मुक्त आहे, आतापर्यंत त्याच्या विरोधात कोणतीच कारवाई करण्यात आली नाही आहे. आमच्यासाठी काही आशा आहे का?' असा सवाल तिने पंतप्रधानांना विचारला आहे.

First published:
top videos

    Tags: Kangana ranaut, Sushant Singh Rajput