रक्षा खडसे यांची अशीही संवेदनशीलता, अपघातग्रस्ताला आपल्या गाडीतून नेले दवाखान्यात

रक्षा खडसे यांची अशीही संवेदनशीलता, अपघातग्रस्ताला आपल्या गाडीतून नेले दवाखान्यात

रक्षा खडसे या भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या स्नुषा आहेत. प्रचाराच्या निमित्ताने या मार्गावरून जात असताना रक्षा खडसे यांची संवेदनशीलता पाहायला मिळाली.

  • Share this:

रावेर, 18 एप्रिल- रावेर लोकसभा मतदार संघाच्या भाजप उमेदवार रक्षा खडसे यांची गुरुवारी संवेदनशीलता पाहायला मिळाली. सावदा-मुक्ताईनगर मार्गावर एका युवकाचा अपघात झाला. यावेळी रक्षा खडसे याच मार्गावरून जात होत्या. रक्षा खडसे यांनी गाडी थांबवून  अपघातात जखमी झालेल्या युवकाची विचारपूस केली. जखमी युवकाला आपल्या गाडीतून दवाखान्यात नेले. युवकाची प्रकृती स्थीर आहे.

रक्षा खडसे या भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या स्नुषा आहेत. प्रचाराच्या निमित्ताने या मार्गावरून जात असताना रक्षा खडसे यांची संवेदनशीलता पाहायला मिळाली.

भरसभेत रक्षा खडसेंना रडू कोसळलं

रावेर लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारास सुरुवात झाली. मुक्ताईनगरची ग्रामदैवत असलेल्या कोथळी येथील मंदिरात संत मुक्ताबाईचे दर्शन घेऊन त्यांनी प्रचारास सुरुवात केली. प्रकृती अस्वस्थतेमुळे एकनाथ खडसे एका  सभेत उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे एकनाथ खडसेंनी मोबाइलद्वारे उपस्थितांशी भावनिक संवाद साधला आणि रक्षा यांना विजयी करण्याचे आवाहन केलं. त्यावेळी व्यासपीठावर असलेल्या रक्षा खडसे यांना अश्रू अनावर झाले होते.

VIDEO : भरसभेत रक्षा खडसेंना रडू कोसळलं

First published: April 18, 2019, 8:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading