अधिवेशनात घमासान सुरू असताना काँग्रेसबद्दल विखे पाटील म्हणतात...

अधिवेशनात घमासान सुरू असताना काँग्रेसबद्दल विखे पाटील म्हणतात...

विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये दाखल झालेले नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसबद्दल भाष्य केलं आहे.

  • Share this:

नागपूर, 18 डिसेंबर : महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठं घमासान सुरू आहे. पहिल्या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर तर दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधकांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं. या सर्व पार्श्वभूमीवर आधी काँग्रेसमध्ये असलेले आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये दाखल झालेले नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाष्य केलं आहे.

'मी ज्या पक्षातून आलोय त्या पक्षाच्या सिद्धांताची पाळंमुळंच आज उखडली जात आहेत. राज्यातही आज आपण तेच होताना पाहतोय, अशी प्रतिक्रिया भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. एकंदरीत काँग्रेसच्या देशभरातील परिस्थितीवर राधाकृष्ण विखे पाटील यांनी जोरदार टीका केली आहे.

खडसेंचं ठरलं? राष्ट्रवादी आणि सेनेच्या मोठ्या नेत्यांच्या भेटीला नागपुरात पोहोचले

दरम्यान, हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात आलेले भारतीय जनता पक्षाचे सगळे आमदार आज रेशीम बागेतल्या संघाच्या कार्यालयात जाणार असून तिथे त्यांचं बौद्धिक घेतलं जाणार आहे. भारतीय जनता पक्षाचे विधानसभा आणि विधान परिषदेचे आमदार यावेळी उपस्थित असणार आहेत. भाजपचे विधिमंडळ गटनेते देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह सगळे आमदार उपस्थित असतील.

दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावरूनच भाजपने पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना कोंडित पकडण्याचा प्रयत्न केला आहे. 'राम मंदिर चळवळ, स्वातंत्र्यवीर सावरकर, नागरिकत्व सुधारणा कायदा, समान नागरी कायदा, काश्मीर 370 याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना स्पष्ट शब्दात सांगणार का?' असा सवाल भाजपचे माजी खासदार किरीट सोमया यांनी उपस्थित केला. काल ठाकरे यांनी सावरकर मुद्दावरून भाजपावर टीका केली होती. त्यावरूनच आता सोमया यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना प्रश्न विचारला आहे.

Published by: Akshay Shitole
First published: December 18, 2019, 9:25 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading