मुख्यमंत्र्यांचा रिमोट कोण चालवतं यापेक्षा विकास महत्त्वाचा, विखे पाटलांचा टोला

मुख्यमंत्र्यांचा रिमोट कोण चालवतं यापेक्षा विकास महत्त्वाचा, विखे पाटलांचा टोला

नाईट लाईफची चिंता करण्यापेक्षा शेतकऱ्यांची चिंता करा, असा सल्लाही विखे पाटील यांनी सरकारला दिला.

  • Share this:

शिर्डी,27 जानेवारी: भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला खोचक टोला लगावला आहे. मुख्यमंत्र्यांचा रिमोट कोण चालवतं यापेक्षा राज्याचा विकास महत्त्वाचा आहे. मूळ विषयाला बगल देण्याचं थांबवावं, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

विखे पाटील शिर्डीत बोलत होते. अतिवृष्टीच्या पंचविस हजार मदतीचे काय झालं...? सातबारा कोरा करण्याच्या आश्वासनाचं काय झालं..? असे सवाल करता महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या पुन्हा वाढल्या असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी आरोप केला. नाईट लाईफची चिंता करण्यापेक्षा शेतकऱ्यांची चिंता करा, असा सल्लाही विखे पाटील यांनी सरकारला दिला. तीन तिघाडी आणि काम बिघाडी, असं काहीसं या सरकारचं झालं आहे.

नव्याने सरकार स्थापन झालंय. राज्यातील प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना शुभेच्छाच, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.

पंकजा मुंडें आंदोलनाला पाठिंबा...

लोकांना दिलासा देण्यापेक्षा अडचणी वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असा आरोप करत राधाकृष्ण विखे पाटील यांनी पंकजा मुंडे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. मागील सरकारने सुरू केलेल्या योजना बंद करण्याचा

ठाकरे सरकारने सपाटा लावला आहे. कोणत्याही आश्वासनाची अद्याप पूर्तता नाही. मराठवाडा वाॅटर ग्रीडच्या कामाला गती देण्याची आवश्यकता असताना स्वर्गीय बाळासाहेब विखेंना श्रेय जाईल, म्हणून सर्वांनी विरोध केला. मात्र, आता पाण्याच्या प्रश्नासाठी सर्वजण भांडताहेत याचा आनंद असल्याचे सांगत विखे पाटील यांनी सरकारला उपहात्मक टोला लगावला. गोदावरीची तूट भरून काढली तर नगर नाशिकसह मराठवाड्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. प्रादेशिक वाद निर्माण करण्यापेक्षा सरकारने पाणी प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज आहे, असेही विखे पाटील यावेळी म्हणाले.

First published: January 27, 2020, 2:58 PM IST

ताज्या बातम्या