निर्यात बंदीला आमचाही विरोधच, विखे पाटलांनी असा घेतला विरोधकांचा समाचार

निर्यात बंदीला आमचाही विरोधच, विखे पाटलांनी असा घेतला विरोधकांचा समाचार

साठेबाजीला अटकाव करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असून निर्यात बंदीचे आम्हीही समर्थन करत नाही.

  • Share this:

शिर्डी, 24 सप्टेंबर: साठेबाजीला अटकाव करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असून निर्यात बंदीचे आम्हीही समर्थन करत नाही. निर्यातबंदीचा आणि नवीन कृषी धोरणाचा कोणताही संबंध नाही. मात्र काँग्रेससह विरोधक संभ्रम पसरवत असून शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण करत असल्याचा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.

हेही वाचा...तब्बल 10 तास ढिगाऱ्याखाली राहून त्यानं अनुभवला मृत्यूचा थरार.. Video व्हायरल

त्या त्यावेळी सरकारला काही निर्णय घ्यावे लागतात. यापूर्वीच्या सरकारनेही असे निर्णय घेतले होते. राज्यातील भाजपा नेत्यांनीही कांदा निर्यातबंदी उठवावी, ही मागणी केलेली आहे. विरोधकांना नवीन कायद्यावर चर्चाच करायची नव्हती. आपल्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड होईल, विरोधकांना भीती असल्यानं काँग्रेससह विरोधकांना शेतकऱ्यांच्या नावावर केवळ राजकारण करायच आहे, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

नवीन कृषी धोरण शेतकरी हिताचे असून नवी कृषी कायदा जरी आला तरी हमीभाव मिळणारच आहे. आजपर्यंत संगनमत करून शेतकरी लूटला जात होता. अनेक बाजार समित्याही या लूटीत सहभागी आहेत. नवीन कायद्यानुसार लुटीला चाप बसणार असल्यानं विनाकारण संभ्रम पसरवण्याचं काम विरोधक करत आहेत. विरोधी पक्ष स्वतः च संभ्रमात असून केवळ राजकारण करत आहे, अशा शब्दांत य अशी टीकाही राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

दरम्यान, केंद्र सरकारनं कांद्यावर तडकाफडकी निर्यातबंदी लादली आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा कांदा प्रश्न पेटला आहे. निर्यात बंदी उठवावी या मागणीसाठी कांदा उत्पादक शेतकारी आक्रमक झाला आहे. यावर लवकरच तोडगा निघणार असून केंद्र सरकारच्या वतीने कांद्यावर लावण्यात आलेली बंदी लवकरच उठवण्यात येईल. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री आणि भाजपचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी 'News18 लोकमत' दिली आहे.

कांदा निर्यातबंदी उठवण्यासाठी धुळ्याचे भाजप खासदार डॉ. सुभाष रामराव भामरे यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेटली. कांदा प्रश्नावर लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी केली. यासंदर्भात भामरेंनी केंद्रीय मंत्र्यांना पत्र लिहिले आहे. कांद्याचे भाव कोसळत असल्याने उत्तर महाराष्ट्र भागातील कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे निर्यातबंदीच्या निर्णयाचा पूनर्विचार व्हावा व निर्यातबंदी उठवावी, अशी मागणी खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केली आहे.

हेही वाचा..."पुलवामातील जवानांपेक्षा जास्त निरागस जीव मुंबईत गेले", कंगना रणौत पुन्हा बरसली

दरम्यान, केंद्र सरकारच्या या निर्णयावर महाराष्ट्रात कांदा उत्पादक शेतकरी नाराज झाला आहे. केंद्र सरकारनं हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा, या मागणीनं जोर धरला आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: September 24, 2020, 6:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading