दारू दुकानं खुली केली जात असतील तर मंदिरे का बंद? विखे पाटलांचा खोचक सवाल

दारू दुकानं खुली केली जात असतील तर मंदिरे का बंद? विखे पाटलांचा खोचक सवाल

'दार उघड उद्धवा दार उघड'... अशा प्रकारची आरोळी देत भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली साईबाबांच्या शिर्डीत घंटानाद

  • Share this:

शिर्डी, 29 ऑगस्ट: 'दार उघड उद्धवा दार उघड'... अशा प्रकारची आरोळी देत शनिवारी साईबाबांच्या शिर्डीत भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांनी घंटानाद आंदोलन केलं. सरकारनं जर आमची मागणी मान्य केली नाही तर मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर घंटानाद करण्याचा इशारा राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे. राज्यात अनलॉक होत असताना दारू दुकानं खुली केली जात असतील तर मंदिरे का बंद? असा खोचक सवाल देखील विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे सरकारला केला आहे.

हेही वाचा...ज्यानं गांजा घेतल्याचं म्हटलं जातं... सुशांतप्रकरणी राजू शेट्टीचं मोठं वक्तव्य

राज्यातील धार्मिक स्थळे खुली करावी, ही मागणी करत शनिवारी राज्यभर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी भाजपनं घंटानाद आंदोलन करण्यात आले. राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिर्डीचे व्यावसायिक आणी गावकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. मार्च महिन्यापासून साईमंदिर बंद असल्यानं परिसरातील शेतकरी आणि शिर्डीतील व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत. साईबाबा संस्थानचीही आर्थिक घडी विस्कटली आहे. आज राज्यात सगळं अनलॉक होत असताना दारू दुकाने जर खुली केली जात असतील तर मंदिरे का बंद? असा सवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.

..तर आम्ही स्वत: मंदिर उघडू- खासदार सुजय विखे पाटील

आज राज्यभरातील गावे अनलॉक झाली आहेत. उद्योग व्यवसाय सुरू झालेत. शिर्डी मात्र जोवर साईमंदिर सुरू होत नाही तोवर कोणताही व्यवसाय सुरू होवू शकत नाही. आजही शिर्डी पूर्णणे बंद असल्याने व्यावसायिक हतबल झाले आहेत. सरकारने लवकर मंदिर सुरू करण्याची परवानगी द्यावी, अन्यथा आम्ही परवानगी नसताना मंदिर सुरू करू, असा इशारा खासदार सुजय विखे यांनी दिला आहे.

हेही वाचा...तुकाराम मुंढेंच्या अडचणी वाढणार? नागपूरच्या उपमहापौरांनी दिला अल्टीमेटम

खरं तर या मुद्द्यावर राजकारण करण्याची वेळ नाही आहे. आज भाजपनं जरी पुढाकार घेतला असेल तरीही मंदिर खुली करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेणं गरजेचं आहे. नाहीतर मंदिरावर अवलंबून असलेला व्यावसायिक उध्वस्त झाल्या शिवाय राहणार नाही, असं जनमानसात बोललं जात आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: August 29, 2020, 2:43 PM IST

ताज्या बातम्या