जळगाव, 8 सप्टेंबर : भारताला एकसंध करण्यासाठी आणि देशाला मजबूत करण्यासाठी काँग्रेस पक्षाने 7 सप्टेंबरपासून भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. कन्याकुमारी ते काश्मीर अशी ही पदयात्रा असेल. या पदयात्रेचे नेतृत्व राहुल गांधी करत आहेत. या भारत जोडो यात्रेवर भाजप नेते आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली.
काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील -
राधाकृष्ण विखे पाटील हे जळगाव दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा करत आहेत. पण त्यांनी ही यात्रा करण्याऐवजी काँग्रेस छोडो कार्यक्रम सध्या देशभर सुरू आहे, त्यावर काम केलं पाहिजे. याबाबत चिंता त्यांनी करायला हवी, या शब्दात त्यांनी राहुल गांधीवर टिका केली.
ते पुढे म्हणाले की, काही लोकांना सत्ता गेल्याचे वैफल्य झाले आहे. त्यामुळे ते वैफल्यातून राज्य सरकारवर टीका करत आहेत. त्यांच्याकडे आपण फार लक्ष द्यायची गरज नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार सक्षमपणे काम करत आहे. तसेच चांगले निर्णय घेत आहे. सरकार म्हणून आम्ही जनतेची जबाबदारी घेतलीये, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
भारत जोडो यात्रेबाबत -
भाजपच्या विरोधात भारत एकत्र करण्याच्या उद्देशाने भारत जोडो यात्रा सुरू करण्यात आली आहे. हा प्रवास काश्मीर ते कन्याकुमारी असा असेल. यादरम्यान ही पदयात्रा 12 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशातून जाणार आहे. याची सुरुवात तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून झाली. या पदयात्रेत 100 हून अधिक नेते राहुल गांधींसोबत सुरुवातीपासून शेवटपर्यंत चालणार आहेत.
हेही वाचा - शिवसेना-भाजप संघर्ष पेटण्याची चिन्हं, भास्कर जाधवांविरोधात पोलिसांत तक्रार
राहुल गांधींच्या या दौऱ्यात फक्त राजस्थानमधील निवडक नेते उपस्थित राहणार आहेत. यात्रेच्या मार्गावर दररोज सभा आणि पथसंचलन होणार आहे. राहुल गांधी यांची ही भाषणे असतील. काही नेत्यांची भाषणेही ठेवण्यात आली आहेत. पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्याचे मन जाणून घेण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.