मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

महसूलमंत्र्यांनीच वाळू माफीया निर्माण केलेत, विखे पाटलांची घणाघाती टीका

महसूलमंत्र्यांनीच वाळू माफीया निर्माण केलेत, विखे पाटलांची घणाघाती टीका

आपल्या बगल बच्च्यांना पाठीशी घालण्याचं काम महसूलमंत्री करत आहेत. महसूलमंत्र्यांनीच वाळू माफिया निर्माण केलेत अशी घणाघाती टीका भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर केली आहे.

शिर्डी,29 फेब्रुवारी:आपल्या बगल बच्च्यांना पाठीशी घालण्याचं काम महसूलमंत्री करत आहेत. महसूलमंत्र्यांनीच वाळू माफिया निर्माण केलेत अशी घणाघाती टीका भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर केली आहे. राज्यात महसूल अधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ले होत असताना महसूलमंत्री गप्प का, असा सवाल उपस्थित करत आपल्या बगल बच्च्यांना पाठीशी घालण्याचं काम महसूलमंत्री करत असून त्यांच्या मतदारसंघात वाळू माफियांचे वर्चस्व आहे. महसूलमंत्र्यांनीच वाळू माफीया निर्माण केलेत, अशी घणाघाती टिका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. राज्यातील वाळू तस्करांवर मोक्का लावा, अशी मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. हेही वाचा...भाजपमधील अंतर्गत कलह उफाळला, सभापतींची कारकीर्द संपताच केले गंभीर आरोप शरद पवारांवर नाव न घेता केली टीका... राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की, सत्तेच्या सारीपाठात सामान्य माणसाचे जीव चालले आहेत. राज्यात महिला अत्याचार वाढले आहेत. मात्र, गृहखातं ठप्प झाले असून रिमोट कंट्रोलने जर राज्य चालणार असेल तर राज्याची अधोगतीच होणार, असा टोला राधाकृष्ण विखे पाटीलनी यांनी शरद पवारांवर नाव न घेता केली. युतीत असताना शिवसेनेची भूमिका वेगळी होती. मात्र आता केवळ सत्ता टिकवण्यासाठी शिवसेनेची भूमिका बदलली आहे. घुसखोरांना हाकला ही बाळासाहेब ठाकरेंची भूमिका होती. आपल्या धोरणांनाच बगल देण्याचे आता शिवसेनेचे काम असून बांगलादेशी घुसखोरांना हाकलण्यासाठी आपण का घाबरतो, असा सवाल उपस्थित करत केला आहे. मतांच्या झोळ्या भरण्यासाठी देश वेठीस धरण्याचे काम सध्या सुरू आहे. यात शिवसेना सहभागी असणं दुर्दैवी असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील म्हटलं आहे. हेही वाचा..मोठी बातमी, मुस्लीम आरक्षणाला शिवसेनेचा पाठिंबा
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: BJP Leader, Radhakrishna vikhe patil, Radhakrishna vikhe patil entering in bjp

पुढील बातम्या