शिर्डी, 18 डिसेंबर: काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी ( Congress President Sonia Gandhi)राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. त्यावरून भाजप (BJP)आणि काँग्रेसमध्ये (Congress) शब्दीक चकमक सुरू झाली आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील (BJP Leader Radhakrish vikhe Patil) यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली आहे. सत्तेकरता काँग्रेस लाचार झाली आहे. महाविकास सरकारचा कुठलाही समान कार्यक्रम नाही.
केवळ सत्तावाटपाचा कार्यक्रम सुरू असल्याचा सणसणीत टोला यावेळी विखे पाटील यांनी लगावला आहे.
हेही वाचा... "माझ्या पतीला पाकिस्तानी, दहशतवादी म्हटलं गेलं" उर्मिला मातोंडकर संतापल्या
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, राज्यातील काँग्रेस नेत्यांनी केंद्रीय नेत्यांची दिशाभूल केली आहे. सोनिया गांधीच्या पत्रामुळे हे स्पष्ट झालं आहे. सत्तेकरता किती लाचारी स्विकारावी, हे स्थानिक नेतृत्त्वानं करून दाखवल्याचं उत्तम उदाहरण असल्याची खोचक टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच नाव न घेता केली आहे.
दरम्यान, या आधी याच मुद्द्यावर भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर पुन्हा एकादा सडकून टीका केली.
हे महाविकास आघाडीचं सरकार दलीत, आदिवासी आणि वंचित समूहाच्या विरोधातील आहे. हेच मी इतक्या दिवसांपासून सांगत होतो. मात्र, आता सोनिया गांधींनीच पत्र लिहून महाविकास आघाडी सरकाराच्या नाकर्तेपणाची पोचपावती दिली आहे. आतातरी सरकारमधील काँग्रेस मंत्र्यांनी सत्तेसाठी लाचारी नाकारून आपल्या समाज बांधवांसाठी न्याय मिळवून द्यावा, असा सल्ला आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.
काय म्हणाले होते बाळासाहेब?
दुसरीकडे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, काँग्रेसमध्ये कोणतीही नाराजी नाही. सोनिया गांधींचे पत्र म्हणजे केवळ संवाद आहे.
हेही वाचा...4 जानेवारीपासून 'या' जिल्ह्यात सुरू होणार शाळा, शिक्षकांची पुन्हा होणार टेस्ट
राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होताना किमान समान कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. सामान्य माणूस महाविकास आघाडीच्या केंद्रस्थानी आहे. गरीब, मागासवर्गावर सरकार जास्त लक्ष पुरवत आहे, असं थोरात यांनी सांगितलं. सोनिया गांधींचा यासाठी सातत्याने संवाद सुरू आहे. यासाठी आता त्यांनी पत्र लिहिलं आहे इतकंच. यात काँग्रेसमध्ये कोणतीही नाराजी नाही, असंही थोरातांनी यावेळी स्पष्ट केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.