उदयनराजे भोसलेंना भाजपची आॅफर ?

उदयनराजे भोसलेंना भाजपची आॅफर ?

'उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये येऊन निवडणूक लढावी तरच ते खासदार होऊन नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवतील'

  • Share this:

विकास भोसले, सातारा, 31 आॅगस्ट : उदयनराजेंना तिसऱ्यांदा खासदार व्हायचे असेल आणि त्यांना जिल्ह्याचा खरोखरच विकास करायचा असेल तर त्यांनी भाजपमध्ये येऊन निवडणूक लढावी तरच ते खासदार होऊन नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवतील अशी आॅफरच भाजपचे नेते पुरूषोत्तम जाधव यांनी दिलीये. तसंच उदयनराजेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी अपेक्षाही जाधव यांनी व्यक्त केली.

सर्वच पक्षांना साताऱ्याचे खासदार उदयनराजेंविषयी प्रेम आहे. परंतू, त्यांची संसदेतील उपस्थिती नगण्य आहे. गेल्या दहा वर्षात सातारा जिल्ह्याच्या ग्रामीण भागात खासदार पोहोचू शकलेले नाहीत, अशी सर्वसामान्य जनतेची खंत आहे. औद्योगिक विकास खुंटला आहे. कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी राजकारणात जातीय समीकरणासाठी सातारा जिल्ह्याचा बळी देऊ नये, अशी सातारकरांची भावना आहे. या भावनेचा सर्व पक्षिय नेत्यांनी विचार करावा अन्यथा सर्व पक्षीय सातारकर जनता ही निवडणूक ताब्यात घेतील असं जाधव म्हणाले.

तसंच 2014 मध्ये देशात नरेंद्र मोदींची लाट होती. तसंच साताऱ्याच्या विद्यमान खासदारांविरोधात प्रचंड असंतोषाचे वातावरण होते. त्यावेळी साताऱ्यातून शिवसेनेचा खासदार शंभर टक्के निवडून येईल, असं वातावरण होतं. पण साताऱ्याची जागा शिवसेनेनं का सोडली याचा खुलासा परिवहन मंत्री दिवाकर रावतेंच्या माध्यमातून समस्त सातारकरांना झाला. त्यावेळी मी शिवसेनेच्या पदाचा राजीनामा देऊन अपक्ष निवडणूक लढलो. तेव्हा मला एक लाख 55 हजार मतं मिळाली होती असं जाधव यांनी सांगितलं.

गेल्या दहा वर्षात सातारच्या राजकारणात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. जिल्ह्यातील अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. त्यामुळे उदयनराजेंना जर तिसऱ्यांदा खासदार व्हायचं असेल आणि जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर त्यांनी भाजपमध्ये येऊन निवडणूक लढवावी तरच ते तिसऱ्यांदा खासदार होऊ शकतील. नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवू शकतील, अशी अपेक्षा जाधव यांनी व्यक्त केली.

पुरूषोत्तम जाधव यांनी उदयनराजेंच्या विरोधात निवडणूक लढवली होती. यात त्यांचा पराभव झाला होता.

विशेष म्हणजे, गुरुवारी झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यातही दिवाकर रावते यांनी उदयनराजे यांना निवडणूक देण्याचं आवाहन केलं होतं. आपण जर छत्रपती शिवाजी महाराजांना मानत असू तर त्यांच्याविरोधात एकही उमेदवार उभा राहता कामा नये. छत्रपतींचा वारस म्हणून महाराष्ट्रातला हा खासदार दिल्लीत बिनविरोध निवडून गेला पाहिजे.

ही भूमिका मी मांडली पण हे सर्वांनी ऐकलं पाहिजे अशी भूमिका उदयनराजेंनी मांडली. या सभेत आम्ही छत्रपतींना नमन करायचं आणि त्यांच्या वारशाला विरोध करायचा..आता तर त्यांना बेवारस करण्याचा कट रचला जातोय. त्यांच्याविरोधात शिवेंद्रराजे उभे राहणार आहे. ते कसे बेवारस राहतील ?, दैवतापुढे नतमस्त होण्याचीही पद्धत असते असं रावते म्हणाले होते.

याआधीही उदयनराजे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा

राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी 9 मे 2018 रोजी मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्री फडणवीस आणि उदयनराजे यांच्यात तब्बल दीड तास चर्चा केली. त्यामुळे उदयनराजे भाजपमध्ये जातील अशा चर्चांना ऊत आला होता. यावर उदयनराजेंनी 'जो तुम्हारे दिल में, वो मेरे दिल में नही', असं आपल्या शैलीत उत्तर देत उदयनराजेंनी चर्चेला पूर्णविराम लावला होता.

आता खुद्द भाजपकडून उदयनराजेंना चालून आॅफर आली आहे त्यामुळे उदयनराजे काय भूमिका घेतात हे पाहण्याचं ठरणार आहे.

VIDEO : कार नव्हे, उदयनराजेंनी डंपर घेऊन शहरात मारला फेरफटका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 31, 2018 08:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading