Home /News /maharashtra /

कंगना रणौतपासून भाजप दोन हात दूर, या नेत्यानं चौकशीबाबत बोलणं टाळलं

कंगना रणौतपासून भाजप दोन हात दूर, या नेत्यानं चौकशीबाबत बोलणं टाळलं

बीएमसी विरुद्ध कंगना अवैध बांधकाम प्रकरण सध्या सिव्हिल कोर्टात असून 25 सप्टेंबरला याबाबतची सुनावणी होणार आहे.

बीएमसी विरुद्ध कंगना अवैध बांधकाम प्रकरण सध्या सिव्हिल कोर्टात असून 25 सप्टेंबरला याबाबतची सुनावणी होणार आहे.

कंगना रणौत हिच्या पेक्षाही राज्यात अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्याकडे आधी लक्ष द्या

मुंबई, 17 ऑक्टोबर: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut)ही पुन्हा एकदा अडचणीत सापडली आहे. वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने कंगना रणौत हिच्या विरोधात एफआयआर (FIR) दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. मात्र, कंगना रणौत हिच्या पेक्षाही राज्यात अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्याकडे आधी लक्ष द्या, हे सांगत भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी कंगनाच्या चौकशीबाबत बोलणं टाळलं. प्रवीण दरेकर म्हणाले की, महाराष्ट्रात परतीच्या पावसाने हाहाकार उडवून दिला आहे. असं असूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरी बसून नुकसानाचा आढावा घेत आहेत, अशी टीका केली. आम्ही राज्यातील 9 जिल्ह्यात 900 किलोमीटरवर दौरा करणार असल्याचं त्यांनी यावेळी जाहीर केलं. हेही वाचा...देवेंद्र फडणवीसही उतरले मैदानात! शरद पवारांच्या बारामतीपासून सुरू करणार दौरा राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी यावेळी केली. पण याकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप दरेकर यांनी केला. आपत्ती करता मदतीसाठी उठसूठ केंद्र सरकारकडे जाऊ नका. राज्याने जबाबदारी घ्यावी, असा टोला देखील दरेकरांनी सरकारला लगावला. जलयुक्त शिवार योजनेबाबत बोलताना दरेकर यांनी सांगितलं की, जलयुक्त शिवार योजना यशस्वी आहे. याबाबत लवकरच सत्य बाहेर येईल. जलयुक्त शिवार चौकशी आणि सिंचनाची ईडीची चौकशी याचा काही संबंध नाही. ईडी त्यांचं काम करत आहे, असल्याचं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांनी पॅटर्न बदलू नये.. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सभा उद्घाटन पॅटर्न बदलू नये. राम मंदिर ऑनलाईन उद्घाटन करा, असं म्हणणारे संजय राऊत दसरा मेळावा जाहीर का घेत आहेत? असा सवाल प्रवीण दरेकर यांनी केला आहे. कोविड चाचणी बोगस किट राज्यात कोविड चाचणी बोगस किट असल्याचा घणाघाती आरोप प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर केला आहे. या किटमुळे कोविडचे निगेटिव्ह रिपोर्ट आले. अमित देशमुख आणि राजेश टोपे एकमेकांवर आरोप करत आहेत. मात्र, जे अधिकारी दोषी असतील त्यांना आधी निलंबित करा. हेही वाचा...दसरा मेळाव्याचं उद्धव ठाकरेंचं भाषण व्यासपीठावरूनच, संजय राऊतांच मोठं विधान ज्या कंपनीनं या किटचा पुरवठा केला. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी दरेकरांनी केली आहे. डॉ. लहाने यांनी याकडे दुर्लक्ष केलं. ज्यांनी घोटाळा उघडकीस केला, त्या अधिकाऱ्यावर सरकारनं कारवाई केली, असा आरोप देखील प्रवीण दरेकर यांनी यावेळी केला.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: BJP, Kangana ranaut, Mumbai, Pravin darekar, Shiv sena

पुढील बातम्या