पंढरपूर, 29 ऑगस्ट : पंढरपूरचे उद्योजक अभिजीत पाटील (Abhijeet Patil) आयकर विभागाने (Income Tax Raid) टाकलेल्या धाडींमुळे अडचणीत सापडले आहेत. पंढरपूर दौऱ्यावर असलेल्या भाजप नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar BJP) यांनी अभिजीत पाटील यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर प्रविण दरेकर यांनी अभिजीत पाटील यांच्याबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. दरेकरांच्या या वक्तव्यामुळे अभिजीत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
'अभिजीत पाटील माझ्या जवळचे नक्की आहेत, भाजपमध्ये सगळेच येत आहेत, त्यामुळे अभिजीत पाटीलही एक दिवस नक्की येतील.अभिजीत पाटलांच्या पाठीशी, मराठी उद्योजक पुढे आला पाहिजे. मराठी उद्योजक चार-चार कारखाने यशस्वीपणे चालवत असेल तर पाठबळ दिलं पाहिजे. राजकीय द्वेषापोटी तक्रार केल्यानंतर आयकर विभागाने ही कारवाई केली आहे', असं प्रविण दरेकर अभिजीत पाटील यांची भेट घेतल्यानंतर म्हणाले.
कोण आहेत अभिजीत पाटील?
अभिजीत पाटील यांनी राज्यातले 4 खासगी साखर कारखाने विकत घेतले. सोलापूर जिल्ह्यातला 20 वर्षांपासून बंद पडलेला साखर कारखाना अभिजीत पाटील यांनी चालवायला घेतला आणि यात त्यांना यश आलं. पंढरपूरमध्ये अभिजीत पाटील यांनी साखर कारखान्याची निवडणूक लढवली, यात त्यांना यश आलं. अभिजीत पाटील यांनी विकत घेतलेल्या चारही साखर कारखान्यांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.