Home /News /maharashtra /

भाजपच्या विजयामुळे 'महाविकास आघाडी'चं उद्याचं भवितव्य स्पष्ट, दरेकरांची खोचक प्रतिक्रिया

भाजपच्या विजयामुळे 'महाविकास आघाडी'चं उद्याचं भवितव्य स्पष्ट, दरेकरांची खोचक प्रतिक्रिया

धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात महाविकास आघाडी आपली 50 टक्के मतंही राखू शकली नाही.

    मुंबई, 3 डिसेंबर: धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात (Dhule Legislative Council by-election) महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) आपली 50 टक्के मतंही राखू शकली नाही.  यावरून उद्याचं महाविकास आघाडी सरकारचं भवितव्य काय राहील, हेच स्पष्ट होत आहे, अशी खोचक प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर (Bjp Leader Pravin Darekar) यांनी दिली आहे. धुळे नंदुरबार मधील अमरीश पटेल यांच्या विजयाने भाजपाची विजयाची शृंखला सुरू झाली आहे. विधानपरिषदेच्या 6 पैकी 6 जागा भाजप जिंकणार, असा विश्वास व्यक्त करतानाच तिन्ही पक्षी एकत्र येऊनही राज्यातील जनता भाजपच्या मागेच असल्याचे सिद्ध झाल्याचंही दरेकर यांनी स्पष्ट केलं. हेही वाचा...सुप्रिया सुळे होणार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री? शरद पवार म्हणाले. महाविकास आघाडीचा पहिला पराभव धुळे आणि नंदुरबार स्थानिक स्वराज संस्थेच्या विधान परिषद पोटनिवडणुकीत (Dhule Legislative Council by-election)भाजपने (BJP) बाजी मारली आहे. भाजपचे उमेदवार अमरीश पटेल (Amrish Patel) मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले आहे. अमरीश पटेल यांच्या विजयाची फक्त औपचारिक घोषणा बाकी आहे. अमरीळ पटेल यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव केला आहे. धुळे आणि नंदुरबार स्थानिक स्वराज संस्थेच्या विधान परिषद पोट निवडणुकीची मतमोजणी पार पडली आहे. भाजप उमेदवार अमरीश पटेल यांना 332 मतं तर महाविकास आघाडीच्या उमेदवार अभिजीत पाटील यांना 98 मतं पडली आहे. 437 पैकी 434 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. या निवडणुकीसाठी 99. 31 टक्के मतदान झाले होते. या पोटनिवडणुकीत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळ लढत होती. भाजपकडून अमरीश पटेल तर महाविकास आघाडीकडून अभिजीत पाटील निवडणूक रिंगणात होते. त्यामुळे ही थेट लढत कोण जिंकणार अशी उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मतमोजणीत 4 मतं बाद करण्यात आली आहे. उरलेल्या 430 मतांची मोजणी पूर्ण झाली आहे. 216 प्रथम प्राधान्याची मतं घेणार उमेदवार जिंकणार असा कल होता. पण, मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर मतदारांचा कौल हा भाजपचे उमेदवार अमरीश पटेल यांना मिळाला. तब्बल 332 मिळवून अमरीश पटेल यांनी मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवला आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर पहिल्या स्थानिक निवडणुकीला सामोरं जात असून पहिल्याच निवडणुकीत पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. हेही वाचा...आताशी कुठे झाली होती नवदाम्पत्याच्या आयुष्याची सुरूवात, क्षुल्लक वादानं केला घात दरम्यान, शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीचाही आज निकाल लागणार आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर, दोन शिक्षक आणि एक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणुकीसाठी आज मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मतदारसंघनिहाय औरंगाबाद पदवीधर 61.08 टक्के, पुणे पदवीधर 50.30 टक्के, नागपूर पदवीधर 54.76 टक्के, अमरावती शिक्षक मतदारसंघ 82.91 टक्के, पुणे शिक्षक मतदारसंघ 70.44 टक्के तर धुळे-नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात सुमारे 99.31 टक्के मतदान झाले. त्यामुळे मतदारांचा कौल कुणाला मिळणार हे पाहण्याचे ठरणार आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: BJP, Maharashtra, Pravin darekar

    पुढील बातम्या