मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Pravin Darekar : प्रवीण दरेकरांची चौकशी संपली, पोलिसांनी नेमके कोणकोणते प्रश्न विचारले?

Pravin Darekar : प्रवीण दरेकरांची चौकशी संपली, पोलिसांनी नेमके कोणकोणते प्रश्न विचारले?

मुंबै बँक (Mumbai bank) बोगस मजूर प्रकरणी (bogus labor case) प्रवीण दरेकर यांची पुन्हा पोलीस चौकशी झाली. या चौकशीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.

मुंबै बँक (Mumbai bank) बोगस मजूर प्रकरणी (bogus labor case) प्रवीण दरेकर यांची पुन्हा पोलीस चौकशी झाली. या चौकशीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.

मुंबै बँक (Mumbai bank) बोगस मजूर प्रकरणी (bogus labor case) प्रवीण दरेकर यांची पुन्हा पोलीस चौकशी झाली. या चौकशीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.

मुंबई, 11 एप्रिल : मुंबै बँक (Mumbai bank) बोगस मजूर प्रकरणी (bogus labor case) भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना आज पुन्हा एकदा पोलीस चौकशीला सामोरं जावं लागलं. पोलिसांनी दरेकरांना (Pravin Darekar) चौकशीसाठी समन्स बजावला होता. त्यानंतर दरेकर आज चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर झाले. यावेळी पोलीस ठाण्याबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पोलीस चौकशीनंतर दरेकरांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. विशेष म्हणजे आपण नेमकं कोणकोणत्या संस्थांमध्ये नेतृत्व करतो याबाबत माहिती घेतली गेली, पोलिसांकडून एफआयआरमधील मुद्दे वगळता दुसऱ्या मुद्द्यांवरुन प्रश्न विचारले गेले, असा दावा दरेकरांनी केला.

प्रवीण दरेकर नेमकं काय म्हणाले?

"खरं म्हणजे तेच तेच मुद्दे पुन्हा उपस्थित करुन माहिती घेत होते. मी कुठे-कुठे नेतृत्व करतो? याची माहिती घेतली जातेय. व्यक्तीकेंद्रीत छळवाद करण्याची भूमिका दिसत आहे. आम्ही लोकशाही मानणारे लोक आहोत. आम्ही शिवसेना नेते संजय राऊतांसारखा आक्रस्थाळपणा करणार नाहीत. ज्या दिवशी एफआयआर झाला त्यादिवसापासून आम्ही सहकार्य करत आहोत. पोलीस मला जेव्हा बोलावतील तेव्हा मी उपस्थित राहीन. तरीही यांना पोलीस कस्टडी कशासाठी हवी आहे?", असा सवाल दरेकरांनी केला.

"हे जे काही सुरु आहे ते सूड भावनेतून सुरु आहे. मला आज जाणीवपूर्वक सरकारच्या दबावाखाली बोलावलं जातं. ज्यावेळी सहकार्य लागेल तेव्हा आम्ही सहकार्य करु", असंदेखील दरेकर यावेळी म्हणाले.

('मंत्रीपद मिळालंय तर नीट काम करा', किशोरी पेडणेकरांचा यशोमती ठाकुरांवर निशाणा)

मुंबै बँक (Mumbai bank) बोगस मजूर प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रवीण दरेकर यांची 4 एप्रिल रोजी रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यामध्ये चौकशी झाली होती. त्यानंतर त्यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी समन्स बजावला होता. त्यानुसार दरेकर आज चौकशीला हजर झाले.

त्याआधी माध्यमांशी बोलत असताना दरेकरांनी पोलिसांवर आरोप केला होता. 'खरं म्हणजे एकदा चौकशी झाली की पुन्हा चौकशी करण्याची आवश्यकता नसते. मात्र मला छळण्यासाठी मला पुन्हा चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे. मला जेवढ्या वेळेला बोलवतील तेव्हा मी जाण्यास तयार आहे. मला जे 30 प्रश्न विचारण्यात आले होते त्याची मी उत्तर देणार आहे" असं दरेकर म्हणाले होते.

काय आहे प्रकरण?

प्रवीण दरेकर यांनी मुंबै बँक निवडणुकीसाठी मजूर संस्थे अंतर्गत अर्ज दाखल केला होता. यापूर्वीही दरेकर मजुर संस्थेचे प्रतिनिधी म्हणूनच मुंबै बँकेवर अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. आताही त्यांनी प्रतिज्ञा मंजूर संस्थेमार्फत मुंबै बँक निवडणुकीसाठी अर्ज भरला. मात्र दरेकर मजुर नसल्याचा आक्षेप घेत त्यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली होती.

(राज ठाकरेंनी बोलावलेली बैठक संपली, आता निर्णय वसंत मोरेंवर!)

या तक्रारीच्या अनुषंगाने दरेकर यांना सहकार विभागाने नोटीस बजावली होती. या नोटिशीत आपण मजूर आहात की नाही? अशी विचारणा दरेकर यांना करण्यात आली होती. तसेच दरेकर यांनी दाखल केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपल्या कुटुंबाची स्थावर मालमत्ता 2 कोटी 9 लाख रुपये असल्याचे दाखवले होते. दुसरीकडे विरोधी पक्षनेते म्हणून दरेकर यांना 2 लाख 50 हजार मानधन मिळत आहे. त्यामुळे आपण प्रथमदर्शनी मजूर असल्याचे दिसून येत नसल्याचेही नोटिशीत नमुद करण्यात आले होते.

First published:

Tags: BJP, Pravin darekar