भाजपचं धक्कातंत्र, विरोधी पक्षनेतेपदी प्रवीण दरेकरांची निवड

भाजपचं धक्कातंत्र, विरोधी पक्षनेतेपदी प्रवीण दरेकरांची निवड

विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाबाबत मोठी चर्चा सुरू होती, त्याबाबतचा सस्पेन्स आता संपला आहे.

  • Share this:

मुंबई, 16 डिसेंबर : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होण्याआधी भाजपने आपल्या विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेत्याची घोषणा केली आहे. भाजपने विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी प्रवीण दरेकर यांची निवड केली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ज्या विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाबाबत मोठी चर्चा सुरू होती, त्याबाबतचा सस्पेन्स आता संपला आहे.

विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी भाजपकडून सुजितसिंह ठाकूर यांचं नावही आघाडीवर होतं. मात्र अखेरच्या क्षणी प्रवीण दरेकर यांच्या नावार शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. त्यामुळे या पदासाठी इच्छुक असणाऱ्या सुरेश धस, महादेव जानकर आणि विनायक मेटे यांना धक्का बसला आहे. कारण या तीनही नेत्यांनी जाहीरपणे या पदावर दावा केला होता.

कोण आहेत प्रवीण दरेकर?

राज ठाकरे यांच्या नेतृत्वात राजकीय वाटचाल सुरू

मनसेच्या प्रमुख नेत्यांमध्ये होता समावेश

2009 ते 2014 मध्ये मनसेच्या तिकीटावर विधानसभेत आमदार

2015 मध्ये भाजपात प्रवेश

2016 मध्ये भाजपकडून विधनपरिषदेवर निवड

मुंबई जिल्हा बँकेत झालेल्या 123 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप

आता विधानपरिषदेत विरोधीपक्षनेते म्हणून निवड

विनायक मेटेंनी केला होता दावा

विधान परिषदेत विरोधी पक्ष नेते पद कोणाला मिळणार? यावर चर्चा सुरू असतानाच शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी या पदावर दावा सांगितला होता. भाजपनं मला मंत्रिपद दिलं नव्हतं, म्हणून आता मला विरोधी पक्ष नेतेपद द्यावं, अशी मागणी विनायक मेटे यांनी केली. बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे आणि विनायक मुंडे यांच्यातील संघर्ष सर्वश्रुत आहे. जिल्ह्याच्या राजकारणात मुंडे-मेटेंमध्ये वारंवार खटके उडत असतात. या पार्श्वभूमीवर विनायक मेटे यांनी विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगितला होता.

महादेव जानकरही होते आग्रही

'घटक पक्षाला विरोध पक्षनेतेपद द्यायचा निर्णय झाला तर मी खरा दावेदार आहे,' अशी भूमिका रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी घेतली होती. भाजपने हे पद स्वतःकडे ठेवलं तर हरकत नाही, पण घटक पक्ष म्हणून माझाच विचार भाजपने करावा, अशी जानकर म्हणाले. एकंदरीत राज्यात सत्ता गमावल्यानंतर विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून भाजपमध्येच संघर्ष होत असल्याचं चित्र निर्माण झालं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: BJP
First Published: Dec 16, 2019 10:36 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading