राम कदमांच्या अटकेनंतर भडकले भाजप नेते; म्हणाले.. ठाकरे सरकारची जुलमी राजवट!

राम कदमांच्या अटकेनंतर भडकले भाजप नेते; म्हणाले.. ठाकरे सरकारची जुलमी राजवट!

अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं, न्याय मागणं सुद्धा ठाकरे सरकारच्या काळात गुन्हा झालं आहे.

  • Share this:

मुंबई, 18 नोव्हेंबर: पालघर साधू हत्याकांडप्रकरणी 'जनआक्रोश' यात्रा काढण्याच्या तयारीत असलेले भाजपचे (BJP) आमदार राम कदम (Ram Kadam) यांना मुंबई पोलिसांनी (Mumbai) ताब्यात घेतलं. बुधवारी सकाळी आमदार कदम आपल्या निवास्थानातून बाहेर पडले असता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावरून भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोध पक्षनेते प्रवीण दरेकर चांगलेच भडकले आहेत.

प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकावर घणाघाती टीका केली आहे. राम कदम यांना ताब्यात घेणं म्हणजे महाराष्ट्रात जुलमी राजवट पुन्हा एकदा सुरू झाल्याचा प्रत्यात्तर आल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा...भीषण दुर्घटना, रत्नागिरीत धावत्या रोरो रेल्वेतून ट्रक कोसळला, धक्कादायक VIDEO

प्रवीण दरेकर म्हणाले, पालघरला जी साधुसंतांची हत्या झाली, त्यासंदर्भात आवाज उठवणं, न्याय मागणं सुद्धा ठाकरे सरकारच्या काळात गुन्हा झालं आहे. लोकप्रतिनिधी राम कदम यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर त्यांना पोलिसांनी तातडीनं ताब्यात घेतलं. यातून राज्यात जुलमी राजवट सुरू आहे, याचं प्रत्यात्तर पुन्हा एकदा आलं. पण तुम्ही कितीही मुस्कटदाबी करा. कितीही लोकांना याठिकाणी अटक करा. राज्यातील साधुसंतासाठी, हिंदुत्त्वासाठी महाराष्ट्रच्या हितासाठी भाजप नेते, हिंदुत्त्ववादी नेते लढत राहातील. आपल्याला जाब विचारत राहातील, असाही इशारा प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारला दिला आहे.

दरम्यान, पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे 16 एप्रिल 2020 रोजी रात्री झालेल्या साधू हत्यांकाडप्रकरणी कोर्टात सुनावणी सुरू आहे. या प्रकरणी राम कदम यांनी जनआक्रोश यात्रेचं आयोजन केलं होतं. परंतु, पोलिसांनी त्यांच्या या यात्रेला परवानगी नाकारली होती. पण, यात्रा काढण्यावर कदम हे ठाम होते.

बुधवारी सकाळी राम कदम आपल्या निवासस्थानापासून या यात्रेला सुरुवात करणार होते. पण, त्याआधीच पोलिसांचा मोठा फौजफाटा त्यांच्या निवास्थानाबाहेर तैनात झाला होता. कदम आपल्या निवासस्थानातून बाहेर पडताच खार पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. विना परवानगी यात्रा काढण्याच्या तयारीत असताना राम कदम यांच्यासह त्यांच्या समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान, मागील महिन्यात 7 ऑक्टोबर रोजी पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे साधूंच्या हत्याकांड प्रकरणी राज्य सरकारकडून नव्याने स्टेटस रिपोर्ट दाखल करण्यात आला. या रिपोर्टमध्ये राज्य सरकारने या प्रकरणात पोलिसांवर काय कारवाई केली याची माहिती दिली आहे.

काय आहे प्रकरण?

कांदिवली येथील सुशीलगिरी महाराज, वाहन चालक निलेश तेलगडे आणि नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील दक्षिण मुखी हनुमान मंदिराचे पुजारी कल्पवृक्षगिरी महाराज हे लॉकडाउनच्या काळात गुजरातकडे चालले होते. चालकाची त्यांच्याकडे प्रवासाठीचा कोणताही पास नसल्याने त्यांना चारोटी टोलनाका येथून पोलिसांनी माघारी पाठवले. म्हणून ते माघारी फिरून आड मार्गाने विक्रमगडहून जव्हार-दाभाडीमार्गे दादरा नगर हवेलीच्या हद्दीवर असलेल्या डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास पोहचले. मात्र, त्याठिकाणी वनविभागाच्या चौकीजवळ जमलेल्या एका जमावाने या तिघांची गाडी अडवली आणि चोर समजून दगड, कोयते, काठ्यांनी मारण्यास सुरूवात केली.

हेही वाचा...चप्पल घालून मंदिरात गेल्यामुळे हाणामारी,भाजप आमदार पडळकरांच्या भावावर गुन्हा

जमावानं त्यांची कारही पलटी केली. गार्डने प्रसंगावधान राखून पोलिसांना सूचना दिली. रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास पोलीस आपल्या गाडीसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या तिघा जखमींना कारमध्ये बसवून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, जमाव शेकडोंच्या संख्येने असल्याने तिथं उपस्थित चार पोलिसांचे काहीच चालले नाही. जमाव अधिकच आक्रमक झाला आणि त्यांनी थेट पोलिसांवरही हल्ला चढवला. या घटनेतून पोलिसांनी कशीबशी आपली सुटका करून घेतली. मात्र, त्या तीन जणांची जमावाने दगड, काठ्या, कोयत्याने वार करुन निर्घृणपणे हत्या केली. या घटनेचे देशभरात तीव्र पडसाद उमटले होते.

Published by: Sandip Parolekar
First published: November 18, 2020, 12:39 PM IST

ताज्या बातम्या