मुंबई : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना बुधवारी जामीन मिळाला. संजय राऊत यांना तब्बल 100 दिवसांनी जामीन मिळाला आहे. त्यांनंतर त्यांनी आज उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांची भेट घेण्यापूर्वी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकारपरिषद देखील पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांचा सूर काहीसा मवाळ दिसला. शिंदे, फडणवीस सरकारने काही चांगले निर्णय घेतले आहेत त्याचं मी स्वागत करतो . मी माझ्या काही कामांसाठी देवेंद्र फडणवीस यांना भेटून बोलणार आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील भेटणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांच्या या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.
काय म्हणाले दरेकर?
देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलंच पाहिजे, मात्र ते अधून मधून कौतुक करतात हाच प्रॉब्लेम आहे. सोईनुसार कौतुक आणि सोईनुसार टीका हे अशी राजकीय भूमिका ठेवू नये असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : Sanjay Raut : 'शिंदे-भाजपचे काही निर्णय चांगले', जेलमधून आल्यानंतर संजय राऊत नरमले?
उद्धव ठाकरेंवर निशाणा
दरम्यान दरेकर यांनी यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. संजय राऊत यांना जामीन मिळाला आहे. हा काय अंतिम निकाल नाही. कोर्ट काय म्हणालं हे सर्व जनतेसमोर आहे. प्रथम दर्शनी कोर्टाला जे वाटलं ती भूमिका त्यांनी मांडली. कोर्टाच्या निकालावर प्रतिक्रिया देणं योग्य होणार नाही. मात्र एका बाजूला म्हणायचं की आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास दृढ झाला आहे. याचाच अर्थ देशात न्यायव्यवस्था आहे. मग याच न्यायालयाने तीन महिने जामीन का दिला नाही हे मात्र ते सांगत नसल्याचं दरेकर यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : 'सूर बदले बदले है जनाब के, कालचा पिंजऱ्यातला वाघ आज मांजरीप्रमाणे बोलला'; मनसेचा राऊतांना टोला
मनसेचा खोचक टोला
जामीन मिळाल्यानंतर संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी शिंदे, फडणवीस सरकारचं कौतुक केलं. यावरून मनसेनं संजय राऊत यांना टोला लगावला आहे. 'कालचा पिंजऱ्यातला वाघ आज मांजरीप्रमाणे बोलला' असा खोचक टोला मनसेचे प्रवस्ते गजानन काळे यांनी राऊतांना लगावला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sanjay raut, Uddhav Thackeray