'...तर एखादी जागा तरी वाढेल', पंकजा मुंडेंचा शरद पवार शाब्दिक हल्ला

'...तर एखादी जागा तरी वाढेल', पंकजा मुंडेंचा शरद पवार शाब्दिक हल्ला

पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

  • Share this:

बीड, 14 ऑक्टोबर : 'बारामतीत लक्ष न घालता शरद पवार हे बीडमध्ये शून्य जागा आहेत तिथं लक्ष घालत आहेत. शरद पवारांनी स्वत:च्या जिल्ह्यात लक्ष घालावं. म्हणजे एखादी जागा तरी वाढेल. बीड जिल्ह्यात ते शक्य नाही,' असं म्हणत भाजप नेत्या आणि परळीतून विधानसभा निवडणुकीसाठी उभा असलेल्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

'पश्चिम महाराष्ट्रासारखा बीड जिल्हा आता स्वत:चे नेतृत्व सांभाळायला सक्षम आहे. शरद पवारांनी बीड जिल्ह्याला राजकारणाशिवाय काहीच दिलं नाही. विकासाची कवडी पण दिली नाही. आम्ही शाश्वत विकास दिला. तुम्ही काय दिले, एखादा बंधारा तरी दिला का?' असा सवाल करत पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वार चौफेर टीका केली.

'बीड जिल्ह्यातील लोकांच्या विकासाची जबाबदारी आम्ही पूर्ण करू. जर पवारांचे जिल्ह्यावर खूपच प्रेम होते तर किमान एखादा प्रकल्प तरी द्यायला हवा होता किंवा रस्ता तरी दिला का? केंद्राचे कृषिमंत्री असताना एक तरी बंधारा दिला का? मग का बीडच्या लोकांना मतदानासाठी हाक देता. हे लोक भोळे आहेत गरीब आहेत. निष्पाप दुष्काळी आहेत. म्हणून त्यांच्यात मनात भिंती आणि जाती-पातीचे बीजारोपण केले,' असा गंभीर आरोपही पंकजा मुंडे यांनी केला आहे.

धनंजय मुंडेंवर टीकास्त्र

'शरद पवारांच्या सभांची आम्हाला सवय झाली आहे. पण पवारांना वारंवार जिल्ह्यात यावं लागतं हे धनंजय मुंडेंसाठी काही चांगलं लक्षण नाही. तरुणांनी वयोवृद्धांना फिरवणं ही चांगली गोष्ट नाही. पवार साहेबांनी येवढं मोठं विश्व निर्माण केलं. धनंजय मुंडेंच्या टीममुळे पुन्हा त्यांना कष्ट करावं लागत आहे. राष्ट्रवादीने विश्वास गमावला आहे. त्यामुळे भविष्य आमचं आहे,' असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

VIDEO : 'निलेशने विचारलं शिवसेनेनं दिलेला त्रास विसरलात का?' नितेश राणे म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 14, 2019 10:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading