मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'चिक्की'मुळे कुणाला विषबाधा झाली नाही, मग...' पंकजा मुंडेंनी आरोप फेटाळले

'चिक्की'मुळे कुणाला विषबाधा झाली नाही, मग...' पंकजा मुंडेंनी आरोप फेटाळले

' जो कर्मावर विश्वास ठेवतो ते या गोष्टी करत नाहीत. सत्ता जाणार नाही हे म्हणतात आणि...'

' जो कर्मावर विश्वास ठेवतो ते या गोष्टी करत नाहीत. सत्ता जाणार नाही हे म्हणतात आणि...'

'चिक्की घोटाळ्याचे आरोप झाल्यामुळे माझ्या अडचणीत कोणतीही वाढ झालेली नाही, ही पूर्णपणे अपूर्ण माहिती आहे'

लातूर, 14 ऑगस्ट : बहुचर्चित चिक्की घोटाळा ( Chikki scam) प्रकरणी उच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थितीत केल्यामुळे माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे (pankaja munde) यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं बोललं जात आहे. पण, 'ही पूर्णपणे अपूर्ण माहिती आहे.  चिक्की खाल्यामुळे कोणती आपत्ती आली, नाही कुणाला विषबाधा झाली नाही' असं म्हणत पंकजा मुंडेंनी आरोप फेटाळून लावले.

लातूरमध्ये आज ओबीसींच्या जागर मेळाव्याचे (obc jagar melava latur) आयोजन  केलं होतं. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पंकजा मुंडे होत्या. टीव्ही 9 वृत्तवाहिनीशी बोलत असताना पंकजा मुंडे यांनी आपल्यावर चिक्का घोटाळा प्रकरणाचे आरोप पुन्हा एकदा फेटाळून लावले.

'चिक्की घोटाळ्याचे आरोप झाल्यामुळे माझ्या अडचणीत कोणतीही वाढ झालेली नाही, ही पूर्णपणे अपूर्ण माहिती आहे. मुळात, चिक्की खाल्यामुळे कोणती आपत्ती आली नाही,  कुणाला विषबाधा झाली नाही. कोणत्याही खाललेल्या व्यक्तीची तशी तक्रारही नाही' असा दावा पंकजा मुंडेंनी केला.

शरीर देतं लो ब्लड शुगरचे संकेत; दुर्लक्ष केल्यास कमी होईल स्मरणशक्ती

तसंच, 'बीडमध्ये प्रचंड दबाब आहे. अवैध धंदे, अवैध दारू, वाळू तस्कर वाढले आहे. आम्ही वारंवार पोलिसांना याबद्दल माहिती देत आहोत. हे बीड जिल्ह्यासाठी हानीकारक आहे' असं म्हणत पंकजा मुंडेंनी अप्रत्यक्षपणे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला.

दरम्यान, ओबीसी समाजाचे आरक्षण वाचवा अन्यथा उद्रेक होईल, आमच्यावर मुंबईमध्ये 10 लाखांचा मोर्चा काढण्याची वेळ आणू नका. समाज शांत आहे. मराठा आणि ओबीसी समाजात फूट पाडण्याचा कुणी प्रयत्न करू नये, आमचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. पण ओबीसी समाजाला त्यांचा हक्का हिरावून घेता कामा नये, मुंबईत १० लाख लोक बोलवू शकतो. आम्हाला चिंता नाही, तो एक दिवस येईल, असा इशाराही पंकजा मुंडे यांनी दिली.

IND vs ENG : विराट कोहलीचा तो निर्णय टीम इंडियासाठी ठरणार घोडचूक!

'ओबीसी समाजाला आरक्षण मिळणार नसेल तर आम्ही शांत बसणार नाही. निवडणुका घेण्याची आमची मानसिकता नाही. आम्ही राज्यात निवडणुका होऊ देणार नाही आमच्या जागाच गेल्याने आम्ही वंचित राहणार असेल तर निवडणुका कशासाठी घ्यायच्या? असा प्रश्न पंकजा मुंडे यांनी उपस्थित केलाय.

तसंच, 'ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी मला पंतप्रधान मोदींकडं, शरद पवारांकडं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेकडं जावं लागलं तरी मी जाईन किंवा समाजासाठी मला कमरेतून झुकून कोणी नमस्कार करा असं म्हटलं तरी मी तो करेन, पण आरक्षणासाठी काहीही करण्याची तयारी आहे' असंही पंकजा मुंडे म्हणाल्यात.

First published: