बीड, 29 नोव्हेंबर : माणूस जितका 'डाऊन टू अर्थ' असतो तितका तो जास्त लोकांची मनं जिंकतो. बीडमध्ये (Beed) सध्या भाजपच्या (BJP) पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्याबाबत तसंच काहिसं घडताना दिसत आहे. पंकजा यांनी नुकतंच त्यांच्या एका कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर त्याच्या पान टपरीला भेट दिली. खरंतर पंकजा यांच्याभोवती नेहमीच कार्यकर्त्यांचा (Part workers) गराडा असतो. विशेष म्हणजे एका कार्यकर्त्याचा आग्रहाचा मान ठेवून पंकजा थेट त्याच्या पान टपरीवर पोहोचल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. यावेळी पंकजा यांनी स्वत: पानाचा विडा बनवला.
पंकजा बीडमध्ये एका कार्यक्रमानिमित्त आल्या असता कार्यकर्त्यांनी आग्रह करुन पान टपरीला भेट देण्याची विनंती केली. कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर पंकजा मुंडे यांनी शेख जमील यांच्या जमील पान सेंटरला भेट दिली. यावेळी पान सेंटरमध्ये गेल्यावर स्वतः पान तयार करण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. त्यांनी स्वतः पानाचा आस्वाद तर घेतलाच पण सोबतच्या सर्व सहकाऱ्यांनाही पान बनवून दिले. या प्रसंगाने उपस्थित गर्दीला पंकजा यांचे वडील दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची आठवण आली. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, रमेश आडसकर, अक्षय मुंदडा, सर्जेराव तांदळे आदी यावेळी सोबत होते.
भाजप नेत्या पंकजा मुंडे कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर पोहोचल्या पानपट्टीवर; स्वतःच बनविला पानाचा विडा #PankajaMude #Beed @Pankajamunde pic.twitter.com/A77J3xljI7
— News18Lokmat (@News18lokmat) November 29, 2021
हेही वाचा : दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या Corona रुग्णाच्या कुटुंबियांची चाचणी, सात जणांचा आला रिपोर्ट
पंकजा यांनी बीड शहरातील बशीरगंज चौकात असणाऱ्या शेख जमील यांच्या तारा पान सेंटरला भेट दिली. त्यांनी स्वतःच्या पानाचा विडा देखील बनविला. यामुळे पंकजा मुंडेंच्या या पानाच्या विड्याची, बीड जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगलीय.
बीडच्या बशीरगंज भागातील शेख जमील यांनी त्यांच्या त्यांच्या जमील पान सेंटरला भेट देण्याचा आग्रह केला, त्यांच्या आग्रहाखातर पान सेंटरला भेट दिली. pic.twitter.com/21d9soumZI
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) November 28, 2021
राजकारणात सर्व सामान्य माणसांत मिसळणाऱ्या दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडेंच्या पावलावर पाऊल टाकून भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी देखील सामान्य लोकांशी नाळ जोडण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी चर्चा आता कार्यकर्त्यांमध्ये होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.