मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'माझा तर मुंगीचा देखील वाटा नाही', पंकजा मुंडे अखेर मंत्रिमंडळ समावेशावर बोलल्या!

'माझा तर मुंगीचा देखील वाटा नाही', पंकजा मुंडे अखेर मंत्रिमंडळ समावेशावर बोलल्या!


शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालं याचा आनंद आहे. मात्र मी या प्रक्रियेमध्ये कुठेच नव्हते त्यामुळे खोट श्रेय मी घेणार नाही

शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालं याचा आनंद आहे. मात्र मी या प्रक्रियेमध्ये कुठेच नव्हते त्यामुळे खोट श्रेय मी घेणार नाही

शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालं याचा आनंद आहे. मात्र मी या प्रक्रियेमध्ये कुठेच नव्हते त्यामुळे खोट श्रेय मी घेणार नाही

बीड, 13 ऑगस्ट : 'शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापनेत माझा खारीचा काय, माझा मुंगीचा देखील वाटा नाही. या प्रक्रियेमध्ये मी पूर्णपणे अनभिज्ञ आहे' असं म्हणत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (pankaja munde) यांनी मंत्रिमंडळात समावेश न केल्याच्या चर्चेंना पूर्णविराम दिला. शिंदे सरकार स्थापन झाले असून मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये पंकजा मुंडे यांना सामील न करून घेण्यात आल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते, पण आज पंकजा मुंडेंनी यावर भाष्य केलं. शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालं याचा आनंद आहे. मात्र मी या प्रक्रियेमध्ये कुठेच नव्हते त्यामुळे खोट श्रेय मी घेणार नाही. सरकार स्थापनेत माझा खारीचा काय, माझा मुंगीचा देखील वाटा नाही. या प्रक्रियेमध्ये मी पूर्णपणे अनभिज्ञ आहे, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी आपण नाराज नसल्याचे स्पष्ट केलं. तसंच, संघर्ष हा माझा मुख्य स्वभाव आहे. कारण तो गोपीनाथ मुंडे यांनी मला वारसात दिला आहे.. संघर्ष हा माझा कुठल्याही व्यक्तीविरोधात नसून तो प्रवृत्ती विरोधात आहे. आणि तो जारी राहणार आहे, मग मी मंत्री झाले काय आणि कोणीही झाले तरी संघर्ष सुरूच राहील, असं देखील पंकजा मुंडे यांनी ठणकावून सांगितलं. ('फडणवीस उद्या दिल्लीत गेले तर...; नितीन गडकरींचं मोठं विधान) 'मी मंत्री होते तेव्हाही संघर्ष केला. केवढ्या आरोपांना सामोरं गेले. किती संघर्षांना सामोरे गेले मी मंत्री असताना कधी एक दिवस सुखाचा तुम्ही बघितला आहे का? असा सवालही पंकजांनी केला. (महाराष्ट्रातून धावणाऱ्या ‘या’ दोन ट्रेनच्या वेळापत्रकात बदल, प्रवासापूर्वी वाचा) 'जे वंचित आहे त्या सर्वांसाठी मी लढणार आहे. मंत्रिमंडळामध्ये महिलांना स्थान देतील अशी अपेक्षा आहे या संदर्भात माझी सक्त मागणी आहे. तसंच प्रत्येक जण मला म्हणतो की, परळी सांभाळा त्यांचा अभ्यास कमी असेल त्यामुळे परळी आता सांभाळू, असं म्हणत पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंना आव्हान दिले आहे.
First published:

पुढील बातम्या