Home /News /maharashtra /

मजुरांच्या व्यथा-वेदनांना पूर्णविराम, सरकारच्या निर्णयावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

मजुरांच्या व्यथा-वेदनांना पूर्णविराम, सरकारच्या निर्णयावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

राज्य सरकारच्या निर्णयामुळे ऊसतोड कामगारांचा स्वगृही परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

बीड, 17 एप्रिल: राज्यातील 38 साखर कारखान्यातील 1 लाख 31 हजार ऊसतोड कामगारांना सुरक्षितपणे घरी पोहोचवण्याचा राज्य शासनाचा निर्णय घेतल्यानंतर भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, अर्थमंत्री जयंत पाटील यांचे आभार मानले आहेत. ऊसतोड कामगारांच्या व्यथा, वेदनांना आता विराम मिळाला असल्याचं सांगत पंकजा यांनी राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत केलं आहे. हेही वाचा..ऊसतोड मजुरांचा स्वगृही परतण्याचा मार्ग मोकळा, धनंजय मुंडेंनी केलं ट्वीट ऊसतोड कामगारांचा स्वगृही परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, आता शांत आणि समाधानी वाटत आहे. माझे लोक घरी जातील. ऊसतोड कामगारांचा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला संघर्ष संपला आहे. त्यांच्या व्यथा, वेदनांना विराम मिळाला आहे. ते आता स्वतःच्या घरी जाऊ शकतील. प्रशासनाने त्यांना सुरक्षितपणे घराकडे पोहोचवावे. कामगारांनी देखील प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावे, आणि आपापल्या घरी सुखरूप पोहोचावे तसेच आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे. हेही वाचा..मुंबईत तैनात होती SRPFची तुकडी, 175 जवानांच्या संपूर्ण ग्रुपला केलं क्वारंटाईन लॉकडाऊनमुळे राज्यात ठिकठिकाणी ऊसतोड कामगार मोठ्या संख्येने अडकले आहेत. हे सर्व कामगार एकत्र असल्याने त्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे त्यांची तपासणी करून सर्वांना सुरक्षितपणे घरी पाठवावे, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी सातत्याने सरकारकडे लावून धरली होती. गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार, मंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा करत होत्या. निर्णयास विलंब होत असल्याने त्या आक्रमक झाल्या होत्या. अखेर राज्यसरकारने ऊसतोड कामगारांच्या घरवापसीचा आदेश शुक्रवारी काढला. राज्य सरकारच्या आदेशाचं पंकजा मुंडे यांनी स्वागत केलं आहे. संपादन- संदीप पारोळेकर

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Corona, पंकजा मुंडे beed news

पुढील बातम्या