परळीतून विजय सोपा नसल्याच्या चर्चेवर पंकजा मुंडेंचं प्रत्युत्तर

बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघात मोठं राजकीय घमासान पाहायला मिळत आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 17, 2019 08:06 PM IST

परळीतून विजय सोपा नसल्याच्या चर्चेवर पंकजा मुंडेंचं प्रत्युत्तर

मुंबई, 17 ऑक्टोबर : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. काही मतदारसंघातील हायहोल्टेज सामन्याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघातही मोठं घमासान पाहायला मिळत आहे. कारण या मतदारसंघात भाजपच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यात रंगतदार सामना पाहायला मिळत आहे.

विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाची तारीख जसजशी जवळ येत तसं निवडणूक निकालाबाबत आडाखे बांधले जात आहेत. त्यातच परळीत यंदाची निवडणूक पंकजा मुंडे यांच्यासाठी अवघड असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र आता याबाबत आज स्वत: पंकजा मुंडे यांनी भाष्य करत पलटवार केला आहे. 'महाराष्ट्रभर आता परळीत माझं काही खरं नसल्याच्या अफवा पसरत आहेत,' असं म्हणत पंकजा मुंडे यांनी या चर्चांवर उत्तर दिलं आहे.

परळी मतदारसंघाबाबत काय आहे चर्चा?

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक रंगतदार स्थितीत असलेली पाहायला मिळत आहे. निवडणुकीच्या मतदानासाठी मोजकेच काही दिवस बाकी असताना युती आणि आघाडीमध्ये चुरशीची लढत होणार असल्याचं दिसत आहे. अशातच अनेकांकडून या निवडणुकीच्या निकालाबाबत अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत. भाजपचाही एक अंतर्गत सर्व्हे समोर आल्याची चर्चा आहे.

भाजपच्या अंतर्गत सर्व्हेनुसार, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काही मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीकडून जोरदार आव्हान निर्माण झालं आहे. भाजप लढत असलेल्या तब्बल 40 जागांवर विरोधकांकडून कडवी झुंज दिली जात असल्याचं भाजपच्याच सर्व्हेतून समोर येत आहे. यामध्ये परळीतून पंकजा मुंडे आणि कर्जत जामखेड मतदारसंघातू राम शिंदे यांच्यासाठी ही निवडणूक अवघड जात असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे परळीत राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे आणि कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवार यांच्याकडून चांगली टक्कर दिली आहे, असं भाजपच्या अंतर्गत सर्व्हेतून समोर आल्याची माहिती आहे. याबाबत एका मराठी वाहिनीने वृत्त दिलं आहे.

Loading...

'40 जागांवर अटीतटीची लढत'

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा झाली तेव्हा ही निवडणूक एकतर्फी होईल, असा अंदाज अनेक राजकीय विश्लेषकांकडून बांधण्यात येत होता. मात्र मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसं अनेक मतदारसंघात आघाडी आणि युतीमध्ये चुरस निर्माण होताना दिसत आहे. भाजपच्या अंतर्गत सर्व्हेनुसार 40 जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून काँटे की टक्कर दिली जात आहे. त्यामुळे या जागांवर युती आणि आघाडीत हायहोल्टेज मुकाबला पाहायला मिळणार आहे.

'122 जागांवर मिळणार विजय'

विधानसभेच्या 40 जागांवर अटीतटीची लढत होताना दिसत असली तरीही आपण 122 जागांवर विजय मिळवू असा आत्मविश्वास भाजपला आहे. याबाबत भाजपच्या अंतर्गत सर्व्हेतून माहिती समोर आल्याचं पक्षाचं म्हणणं आहे. असं असलं तरीही भाजपकडून या सर्व्हेबद्दल आतापर्यंत कोणीही माध्यमांसमोर येऊन बोललेलं नाही.

VIDEO : 'देवेंद्र फडणवीस ठरवणार उपमुख्यमंत्री', पाहा काय म्हणाले अमित शाह

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 17, 2019 08:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...