मुंबई, 7 नोव्हेंबर : अखेर आर्थिक मागास वर्गाला 10 टक्के आरक्षण देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. या निर्णयाचं भाजपकडून स्वागत केलं जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या राज्यातील अनेक नेत्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं. तर दुसरीकडे विरोधकांकडू या निर्णयावर टीका करण्यात येत आहे.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. मी सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत करते, आर्थिक मागास वर्गाला 10 टक्के आरक्षण देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्यानं आर्थिक मागास वर्गाला याचा नक्की फायदा होईल, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. तसेच मुंडे यांनी यावेळी आरक्षणाच्या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेदेखील आभार मानले आहेत.
नेमकं काय म्हणाल्या पंकजा मुंडे? -
पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत. सर्वोच्च न्यायालयानं आर्थिक मागास वर्गाला 10 टक्के आरक्षण देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं. या निर्णयाचं मी स्वागत करते. या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाला मोठा दिलासा मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कार्यकाळात आतापर्यंत जे काही महत्त्वाचे निर्णय घेतले, त्यापैकी हा एक निर्णय आहे.
सुप्रीम कोर्टाने या निर्णयाला वैध ठरवले आहे. त्यासाठी मी सुप्रीम कोर्टाचे आभार मानते. समाजात दोन वर्ग आहेत, एक म्हणजे आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग आणि दुसर सामाजिक दृष्ट्या मागास प्रवर्ग, मला वाटतं ज्याप्रमाणे सामाजिक मागास प्रवर्गाला आरक्षणाची गरज आहे, त्याच पद्धतीने आर्थिक मागास वर्गाला देखील आरक्षणाची गरज असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा - '...तर आजही वेळ आली नसती', श्रीकांत शिंदेंचा आदित्य ठाकरेंना खोचक टोला
'महिलांचा आदर ठेवा' -
दरम्यान दुसरीकडे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. या वक्तव्यावर देखील पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अब्दुल सत्तार सुप्रिया सुळे यंच्याबद्दल काय बोलले हे अद्याप मी ऐकलेलं नाही. मात्र कोणीही महिलांबद्दल बोलताना अपशद्ब वापरले अयोग्य आहे. नेता कुठल्याही पक्षाचा असो महिलांबद्दल आदर ठेवायलाच हवा असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.