'पक्ष माझ्या बापाचा, मी कुठेही जाणार नाही', पंकजा मुंडे गरजल्या!

'पक्ष माझ्या बापाचा, मी कुठेही जाणार नाही', पंकजा मुंडे गरजल्या!

पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातील दुख:ला वाट मोकळी करून दिली आहे.

  • Share this:

बीड, 12 डिसेंबर : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी परळीतील गोपीनाथ गडावर समर्थकांचा मेळावा घेऊन आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. 'पक्ष माझ्या बापाचा आहे, असं मी का म्हणू नये. मी बंडखोरी का करू? मी पक्ष सोडून कुठेही जाणार नाही. आता चेंडू भाजपच्या कोर्टात आहे,' असं म्हणत पंकजा मुंडे यांनी आपली खदखद व्यक्त केली आहे.

'माझ्यावर पदासासाठी दबावाचा आरोप केला जात असेल तर मी आता भाजपच्या कोअर कमिटीची सदस्य नाही, भाजप कोअर कमिटीच्या जबाबदारीतून चंद्रकातदादा मी मुक्ती मागत आहे,' असं म्हणत पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातील दुख:ला वाट मोकळी करून दिली आहे.

'मी लवकरच गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या कार्यालयाचा उद्धाटन करणार आहे. मराठवाड्याच्या सिंचनाच्या प्रश्नावर लक्ष वेधून घेण्यासाठी जानेवारीला लाक्षणिक उपोषण करणार,' अशी मोठी घोषणा पंकजा मुंडे यांनी केली आहे. तसंच आगामी काळात गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून राज्यभरातील प्रश्नांसाठी आपण संघर्ष करणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे.

पंकजा मुंडे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे:

-पक्षाची गरीमा ठेवण्याचं काम प्रत्येक कार्यकर्त्याचं आहे

-आपण पक्ष रिव्हर्स गीअरमध्ये नेऊ नये

-पक्ष हा एका व्यक्तीचा नाही

-मला कोणत्या पदाची अपेक्षा नाही

-मला विरोधी पक्षनेतेपद मिळू नये म्हणून कोणी कारस्थान करत आहे का?

-मी पक्ष सोडावं अशी कुणाची अपेक्षा आहे?

-मी बंड करणार ही पुडी कुणी सोडली?

-माझ्या रक्तात गोपीनाथ मुंडेंचं संस्कार

-माझी अपेक्षा कुणाकडून नाही

-मी का बंड करु

-शेवटच्या दिवसापर्यंत भाजपचा एक एक आमदार निवडून यावा यासाठी प्रयत्न करत होते

-गोपीनाथ मुंडेंनी कधी कुणाच्या पाठित खंजीर खुपसला नाही

-गोपीनाथ मुंडेंचं रक्त अळणी नाही

-फाटक्या लोकांनी माझी संघर्षयात्रा काढली

-गेल्या काही दिवसात राजकारणाचा जेवढा अनुभव आला तेव्हा कधीच आला नव्हता

-अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली हे कुणाला कसं कळलं नाही

-पराभवासारख्या चिल्लर गोष्टींनी खचणारी मी नाही

- आता भाजपच्या कोर्टात बॉल

- पंकजा मुंडे बेईमान होणार नाही

- आपला हक्क आपल्याला घ्यायचा आहे

- पक्ष स्थापायचा की नाही ते पुढे ठरवू

- पुढे काय करायचं ते बघू

- एका महिलेनं राज्याचं नेतृत्व कऱण्याची अपेक्षा ठेवली तर त्यात चूक काय?

- मला मुख्यमंत्री व्हायचं असं म्हटलं तर त्यात काय चुकीचं

First published: December 12, 2019, 3:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading