Elec-widget

धनंजय मुंडेंवर शाब्दिक हल्ला करत पंकजा यांनी सांगितलं परळीतून लढण्याचं कारण

धनंजय मुंडेंवर शाब्दिक हल्ला करत पंकजा यांनी सांगितलं परळीतून लढण्याचं कारण

जयदत्त क्षीरसागर यांच्या मुद्द्यावरून पंकजा मुडेंनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला.

  • Share this:

सुरेश जाधव, बीड, 10 ऑक्टोबर : 'अनेक कार्यकर्ते आणि 15 आमदार मला आग्रह करत होते की तुम्ही आमच्या मतदारसंघात लढा. तसं पाहिलं तर मी दुसरीकडे कुठेही निवडणून आले असते. पण मला परळीतच मैदान गाजवायचं आहे,' असं वक्तव्य परळीतून विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या पंकजा मुंडे यांनी केलं आहे. त्या जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ बीड मतदारसंघातील रायमोहा या ठिकाणी आयोजित सभेत बोलत होत्या.

'युतीत कधीच बिघाड होत नाही. आघाडीत बिघाडी होते. माझे आणि शिवसेना प्रमुखांचे कौटुंबिक संबंध आहेत. राष्ट्रवादीत जयदत्त अण्णा असताना आमची चर्चा व्हायची. जिल्हा एक मुठीत आहे म्हणून विकास झाला. मी बीड मतदारसंघात जास्तीचा निधी दिला. विरोधीपक्ष किंवा कोणताच भेद विकासात केला नाही. मात्र अण्णाला आम्ही बोलवत होतो. त्या बाबतीत अनेक वर्ष कुकिंग चालू होतं. राष्ट्रवादीत डोईजड नेता झाला की त्याला राजकारणात कमी करा नाहीतर वैयक्तीक त्रास द्या असे चालत होते. ढकलून ढकलून दिले. शेवटी खूप त्रास सहन केला.' असं म्हणत जयदत्त क्षीरसागर यांच्या मुद्द्यावरून पंकजा मुडेंनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला.

'धनंजय मुंडे 2 नंबरचे नेते'

मी दुसरीकडे कुठेही निवडून आले असते पण मला परळीतच मैदान गाजवायचं आहे. वोटींग मशीनवर माझं तिसरं बटन आहे. कारण ही माझी तिसरी निवडणूक आहे. जयदत्त अण्णांचे एक नंबरचे बटन आहे, कारण ते सीनियर आहेत. तर आमचे बंधू धनंजय मुंडे दोन नंबरचे आहे, म्हणजे दोन नंबरचे बटन आहे. पण मी यावर्षी पण हैट्रिक करणार आहे,' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

'मुंडे साहेबांची शिकवण'

Loading...

राजकारण करताना मुंडे साहेबांची शिकवण आहे की बेरजेचे राजकारण करायचं. राजकारणात कधीही कोणीही कायमचा शत्रू आणि मित्र नसतो. त्यामुळे येत्या काळात सरकार महायुती येणार आहे. तरी चिन्ह लक्षात ठेवून जयदत्त क्षिरसागर यांना निवडून द्या,' असं आवाहन पंकजा मुंडे यांनी उपस्थितांना केलं.

VIDEO: 'राजीनामा द्यायला जिगर लागतं'; उदयनराजेंकडून विरोधकांचा समाचार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 10, 2019 04:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...