Home /News /maharashtra /

साखर कारखान्याच्या इतिहासात सर्वात जास्त कारखाने अजित पवारांनी बुडवले; पंकजा मुंडेंची घणाघाती टीका

साखर कारखान्याच्या इतिहासात सर्वात जास्त कारखाने अजित पवारांनी बुडवले; पंकजा मुंडेंची घणाघाती टीका

पंकजा मुंडे, भाजप नेत्या

पंकजा मुंडे, भाजप नेत्या

साखर कारखान्याच्या इतिहासात सर्वात जास्त कारखाने उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) बुडवले, अशी घणाघाती टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केली.

बीड, 9 एप्रिल : साखर कारखान्याच्या इतिहासात सर्वात जास्त कारखाने उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) बुडवले, अशी घणाघाती टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केली. त्या आंबेजोगाई येथील सोयाबीन शेतकरी मित्र मेळाव्यात बोलत होत्या. आधी अजित पवारांनी केली होती पंकजा मुंडेंवर टीका बीडच्या केस तालुक्यातील येडेश्वरी साखर कारखान्याच्या कार्यक्रमात त्या बोलताना उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली होती. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर टीका करताना कारखाना चालवण्यासाठी कर्तुत्व लागते. ते येरागबाळ्याचं काम नाही, अशा शब्दात त्यांनी पंकजा मुंडेंवर टीका केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना पंकजा मुंडे यांनी अजित पवार यांचा चांगलाच समाचार घेतला. हेही वाचा - ST कर्मचाऱ्यांच्या धुडगूस प्रकरणाला नवे वळण, FIR मध्ये धक्कादायक माहिती समोर 'या' शब्दात पंकजा मुंडेंचे अजित पवारांना प्रत्युत्तर  पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, अजित पवारांनी साखर कारखाने बुडवले, त्याचा इतिहास महाराष्ट्र देऊ शकतो. कारखान्याच्या नावाने कोट्यावधी रुपये घेतले. ते वापरले किती? असा सवाल करत कारखान्यांची कवडीमोल भावाने विक्री केली, या प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली नाहीत. अगोदर महाराष्ट्राला या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. तसेच अजित दादा बीडमध्ये आले होते तर बीडमधील अतिरिक्त उसाचा प्रश्न संदर्भात मदत जाहीर करतील, अशी अपेक्षा होती. मात्र, ते करायचे सोडून ते इतरांवर टीका करत राहिले, हे दुर्दैव आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
Published by:News18 Desk
First published:

Tags: Ajit pawar, Maharashtra politics, Pankaja munde

पुढील बातम्या