अजितदादा आता तुमच्या पक्षाचा अंत जवळ आलाय, पंकजा मुंडेंची जहरी टीका

अजितदादा आता तुमच्या पक्षाचा अंत जवळ आलाय, पंकजा मुंडेंची जहरी टीका

अजितदादा तुमच्या पक्षाचा अंत जवळ आला आहे. त्यामुळे तुम्ही लोक बिथरले आहात..अशा शब्दांत राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे.

  • Share this:

बीड, 3 ऑगस्ट- अजितदादा तुमच्या पक्षाचा अंत जवळ आला आहे. त्यामुळे तुम्ही लोक बिथरले आहात..अशा शब्दांत राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे. परळी तालुक्यातील धर्मापुरी येथील विकास कामाच्या उद्घाटनप्रसंगी पंकजा मुंडे बोलत होत्या.

पंकजा म्हणाल्या, ज्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा कारभार आयुष्यात सांभाळला त्यांचे अज्ञान आहे. तसेच कोणतं खात कोणत्या मंत्र्यांचे आहे, हे अजित पवारांना कळत नाही, असाही टोला त्यांनी लगावला. जुना दाखला देत पुणे जिल्ह्यात 2013 मध्ये 404 बालमृत्यू झाले होते. ती जबाबदारी पालकमंत्री म्हणून तुमची नव्हती का? उलट आता बाल मृत्यूचे प्रमाण अर्ध्याने कमी झाले आहे.

पंकजा मुंडे यांच्या हस्ते शनिवारी परळी तालुक्यातील धर्मापूरी येथे 91 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा प्रारंभ झाला. यावेळी धर्मापूरी-पानगांव या 25 किमी लांबीच्या, 86 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्गाचे भूमिपूजन करण्यात आले. याबरोबरच 5 कोटी रुपयांच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे लोकार्पण देखील करण्यात आले.

विकासाची शब्दपूर्ती करतांना पंकजा मुंडे यांच्या प्रयत्नांतून परळी मतदारसंघात 154 किमी लांबीचे तीन राष्ट्रीय महामार्ग मंजूर झाले असून त्यासाठी 917 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे परळी हे राष्ट्रीय महामार्गाच्या नकाशावर आले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून प्रत्येक गावात विकासाची कोट्यवधी रुपयांची कामे सध्या सुरू असून जनतेला दिलेला विकासाचा शब्द त्या पूर्ण करत आहेत,असे मत यावेळी नागरिकांनी व्यक्त केले. याबद्दल मतदारसंघातील जनतेने त्यांचे सत्कार करत आभार मानले. यावेळी जि.प.अध्यक्षा सविता गोल्हार, यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SPECIAL REPORT: ओबीसींच्या राजकीय आरक्षणात कपात, निवडणुकीआधी वाद पेटणार

Published by: Sandip Parolekar
First published: August 3, 2019, 10:17 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading