भाजपमध्ये पडणार मोठी फूट? 24 तासांत चित्र होणार स्पष्ट

भाजपमध्ये पडणार मोठी फूट? 24 तासांत चित्र होणार स्पष्ट

पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे हे बंड करणार असल्याची शक्यता दिवसेंदिवस गडद होताना दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 11 डिसेंबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला दुहेरी धक्का बसला आहे. कारण निवडणुकीनंतरच्या वाटाघाटीत शिवसेनेसोबत बिनसल्याने भाजपला राज्यातील सत्ता गमवावी लागली. त्यानंतर भाजपला बंडखोरीचं मोठं ग्रहण लागलं आहे. 'मास बेस लीडर' अशी ओळख असलेले पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे हे बंड करणार असल्याची शक्यता दिवसेंदिवस गडद होताना दिसत आहे.

भाजपच्या महत्त्वाच्या बैठका टाळून पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गड येथील उद्या होणाऱ्या मेळाव्याकडे आपलं संपूर्ण लक्ष केंद्रीत केलं आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने पंकजा यांनी मराठवाडा विभाग आणि नंतर झालेल्या भाजपच्या विस्तारीत कोअर कमिटीच्या बैठकीला जाणं टाळलं. त्यामुळे पंकजा मुंडे यांची नाराजी स्पष्ट झाली आहे. पण फक्त पंकजा मुंडे नाही तर भाजपमधील नाराजांची यादी मोठी आहे.

भाजपची बैठक का टाळली? अखेर पंकजा मुंडेंनी सांगितलं कारण

विधानसभा निवडणुकीत भाजपने एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता, राज पुरोहित, चंद्रशेखर बावनकुळे अशा अनेक नेत्यांची तिकिटे कापली. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्यासह यातील काही नेते पंकजा मुंडे यांच्या गोटात दाखल होण्याची शक्यता आहे. पंकजा मुंडे यांच्या उद्या होणाऱ्या मेळाव्याला भाजपचे नेमके कोणते नेते उपस्थित राहतात, यावर भाजपच्या फुटीच्या तीव्रता समोर येऊ शकते. तसंच या मेळाव्यात पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे नेमकी काय भूमिका घेतात, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

बिनखात्याच्या मंत्र्यांची होणार कॅबिनेट बैठक, अद्याप सर्व खाती उद्धव ठाकरेंकडेच!

2014 मध्ये राज्यात सत्तांतर घडल्यानंतर भाजपमध्ये नेतृत्वावरून कुरघोडी सुरू झाली. मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांना मागे टाकत देवेंद्र फडणवीस यांनी बाजी मारली. त्यानंतर काही महिन्यांनी एकनाथ खडसे यांना मंत्रिमंडळातूनही बाहेर पडावं लागलं. तसंच यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा सर्व प्रचार देवेंद्र फडणवीस यांच्याभोवतीच फिरत होता. त्यामुळे निवडणूक निकालानंतर भाजपला सत्तास्थापनेस अपयश आल्यानंतर नाराज नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

First published: December 11, 2019, 11:33 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading