उद्धव ठाकरेंना दुसरा धक्का, मुंबईत पोहोचलेले नितीन गडकरी म्हणाले...

उद्धव ठाकरेंना दुसरा धक्का, मुंबईत पोहोचलेले नितीन गडकरी म्हणाले...

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या विधानाने उद्धव ठाकरेंना दुसरा धक्का बसला आहे.

  • Share this:

मुंबई, 8 नोव्हेंबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने दिलेला समसमान सत्तावाटपाचा शब्द पाळावा, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपकडे मुख्यमंत्रिपदाची मागणी केली आहे. पण आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आता भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या विधानाने उद्धव ठाकरेंना दुसरा धक्का बसला आहे.

'विधानसभा निवडणुकीनंतर समसमान सत्तावाटप होईल, असं काही आमच्यात ठरलं नव्हतं. मुख्यमंत्री मीच होईल,' असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीत स्नेहभोजनावेळी केला होता. त्यानंतर आता नितीन गडकरी यांनीही फडणवीसांच्याच दाव्याला दुजोरा दिला आहे. 'समसमान सत्तावाटप असं काही ठरलं नव्हतं. आता हा पेच सोडवण्यात गरज लागली तर मी मध्यस्थी करण्यास तयार आहे,' असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. याबाबत 'न्यूज 18 इंडिया'ला सूत्रांनी माहिती दिली आहे.

नितिन गडकरी कोंडी फोडणार?

भाजप आणि शिवसेनेमध्ये सत्तास्थापनेचा तिढा असताना नितीन गडकरी यांची नेमकी काय भूमिका असणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडकरींची दिल्लीत भेट घेतली होती. त्यानंतर काल गडकरींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची नागपूर इथं भेट घेतली. या पार्श्वभूमीवर राजकीय कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न करणार का, हे पाहावं लागेल.

दरम्यान, महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतल्याने भाजपसमोर आव्हान निर्माण झालं असताना भाजपचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे अमित शहा मात्र या सगळ्यापासून दूर असल्याचं दिसत आहे. अशातच एक नवी माहिती समोर आली आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आपलं पूर्ण लक्ष सध्या राम मंदिर आणि नागरिक दुरुस्ती विधेयक या दोन मुद्द्यांवर केंद्रीत केलं असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

अमित शहा दिल्लीतच व्यस्त असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डोकेदुखी मात्र वाढणार आहे. कारण मुख्यमंत्रिपदाबाबत कोणतीही तडजोड करायची नाही, अशी ठाम भूमिका शिवसेनेनं घेतली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळूनही देवेंद्र फडणवीस यांना अजूनही पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळवणं शक्य झालेलं नाही. अशातच आमच्याकडे भाजपलाही पर्याय आहे, असा दावा शिवसेनेकडून करणयात येत आहे. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असं सत्तासमीकरणही नाकारता येत नाही.

VIDEO : शिवसेनेसोबत चर्चा झाली का? जयंत पाटलांचा खुलासा

First published: November 8, 2019, 1:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading