शिवसेनेसाठी मित्र पक्षानीच रचला मृत्यूचा सापळा, नितेश राणेंचा घणाघाती प्रहार

शिवसेनेसाठी मित्र पक्षानीच रचला मृत्यूचा सापळा, नितेश राणेंचा घणाघाती प्रहार

  • Share this:

मुंबई, 4 डिसेंबर: विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील 6 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीनं जोरदार मुसंडी मारली. भाजपला केवळ एका जागेवर समाधान मानावं लागल. हा पराभव भाजप नेत्याच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.

शिवसेनेचे कट्टर विरोधी नेते आणि भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकार घणाघाती प्रहार केला आहे. शिवसेनेसाठी मित्र पक्षानीच (काँग्रेस आणि राष्ट्रवादी) मृत्यूचा सापळा रचला आहे, अशा शब्दांत नितेश राणे यांनी विधानपरिषद निकालांवरुन शिवसेनेवर टीका केली आहे.

हेही वाचा...या परीक्षेत हुशार विद्यार्थ्यांनाही फुटतो घाम, दृष्टीहीन जयेशचं नेत्रदीपक यश!

नितेश राणे म्हणाले, ठीक आहे आम्ही कमी पडलो! पण ज्या पक्षाचा (शिवसेना) मुख्यमंत्री आहे. त्यांनाच या निवडणुकीत भोपळा मिळाला. मित्र पक्षानीच (काँग्रेस आणि राष्ट्रवादी) शिवसेनेसाठी मृत्यूचा सापळा रचला आहे, अशी खोचक टीका केली आहे. एवढंच नाही तर 'बाकी मैदानात परत भेटूच !!', असे आव्हान देखील दिलं आहे.

फडणवीस यांनी शिवसेनेवर तोफ डागली

विशेष म्हणजे पुणे आणि नागपूरसारख्या भाजपच्या बुरुजालाही सुरुंग लावत येथेही महाविकास आघाडीनं विजयाचा झेंडा रोवला आहे. असं असतानाही विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर तोफ डागली आहे.

नुकत्याच झालेल्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत झालेल्या निवडणुकीत शिवसेनेला एकही जागा जिंकता आली नाही. शिवसेनेनं परभवाचं आत्मपरिक्षण करावं, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, नुकत्याच झालेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपनं किमान एक जागा राखली. पण, शिवसेनेनेला भोपळाही फोडता आला नाही. शिवसेनेच्या हाती काहीही लागलं नाही.

हेही वाचा...पुण्यातील जुन्नर हादरलं! माहेरी आलेल्या पत्नीनं पतीच्या टोक्यात घातलं दांडकं

महाविकास आघाडीत तीन पक्ष एकत्र आले. त्यामुळे त्यांच्या शक्तीचा अंदाज आम्हाला आला नाही, हे देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केलं. परंतु या निवडणुकीचा महाविकास आघाडीतील केवळ दोनच पक्षांना फायदा झाला. एका पक्षाला तर एकही जागा मिळाली. ज्या पक्षाचा राज्यात मुख्यमंत्री आहे त्याच पक्षाला अर्थात शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही, ही बाब गंभीर आहे. शिवसेनेनं या पराभवाचं आत्मचिंतन करावं, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: December 4, 2020, 4:28 PM IST

ताज्या बातम्या