Home /News /maharashtra /

''विचार करा..'', निलेश राणेंचं छत्रपती संभाजीराजेंना Tweet करुन आवाहन

''विचार करा..'', निलेश राणेंचं छत्रपती संभाजीराजेंना Tweet करुन आवाहन

भाजप नेते निलेश राणे (BJP leader Nitesh Rane) यांनी संभाजीराजेंना आवाहन दिलं आहे.

    मुंबई, 23 मे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी छत्रपती संभाजी राजेंना (Chhatrapati Sambhaji Raje) वर्षावर येण्याचं आमंत्रण दिलं. ते आमंत्रण संभाजी राजेंनी स्विकारलं आहे. या सर्व गाठीभेटी राज्यसभेच्या (Rajya Sabha) सहाव्या जागेसाठी सुरु आहेत. आज 12 वाजता संभाजीराजे वर्षावर जाणार आहेत. संभाजीराजेंनी हे आमंत्रण स्विकारलं असल्यानं आज ते खासदारकीसाठी हातात शिवबंधन बांधणार का अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान यावरुन भाजप नेते निलेश राणे (BJP leader Nitesh Rane) यांनी संभाजीराजेंना आवाहन दिलं आहे. छत्रपती संभाजीराजेंना आवाहन करणारं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे. निलेश राणे यांचं ट्विट निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, कोल्हापूरचे छत्रपती संभाजी, आज रात्रभर विचार करा की ज्या पक्षाने मूक मोर्चा ला मुका मोर्चा म्हणून खिल्ली उडवली, तुमच्याकडे महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे मागितले, औरंगजेबच्या कबरीला संरक्षण दिले, पक्षात 12 वाजता या सांगून तुमची काय किंमत ठेवली? लाथ मारा त्या खासदारकीला. वर्षावर आज भेट विधानसभा आमदारांमधून निवडून द्यावयाच्या राज्यसभेच्या (Rajya Sabha) सहाव्या जागेसाठी अपक्ष उमेवार म्हणून उभे राहण्याचा निर्धार छत्रपती संभाजीराजे यांनी केला आहे. त्यानंतर संभाजीराजे छत्रपतींनी शिवसेनेत प्रवेश केल्यास त्यांची उमेदवारी जाहीर करू असा पवित्रा शिवसेनेनं (Shiv Sena) घेतला आहे. यानंतरच छत्रपती संभाजी राजेंना वर्षावर येण्याचं आमंत्रण दिलं आहे. दरम्यान संभाजीराजेंनी निमंत्रण स्वीकारलं. खासदारकीसाठी संभाजीराजे शिवबंधन बांधणार का? याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. दरम्यान अजून तरी राजे हे शिवसेनेत प्रवेश करण्यास तयार नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दुसरीकडे संभाजीराजे यांनी शिवसेनेची ऑफर न स्वीकारल्यास अभिनेत्री उर्मिला मातोंडकर किंवा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्याचा शिवसेना नेतृत्वाचा विचार आहे. संभाजीराजे सर्व मराठा समन्वयकांशी चर्चा करणार शिवसेनेनं दिलेल्या ऑफरबद्दल छत्रपती संभाजीराजे सर्व मराठा मोर्चाच्या समन्वयकांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आज दुपारी 12 वाजता वर्षावर काय होतं हे पाहणं उत्सुकतेचं आहे. काय आहे प्रकरण? मातोश्रीचा चक्रव्यूह संभाजी राजे भेदू शकणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेवर संभाजीराजेंनी (Sambhaji Raje) अपक्ष निवडणूक लढण्याचं जाहीर केलं. तर शिवसेनेने सुद्धा या जागेवर आपला उमेदवार देण्याचं म्हटलं आहे. यानंतर संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची (CM Uddhav Thackeray) भेट घेतली. या भेटीत संभाजीराजेंना शिवसेनेकडून सहाव्या जागेवर उमेदवारीची ऑफर देण्यात आली. त्यानंतर आज मराठा संघटनांच्या प्रतिनिधींनी आज सकाळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भेट घेतली. छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी मराठा संघटनांच्या प्रतिनिधींनी संजय राऊत यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर संजय राऊतांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत काय झालं? याबाबत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Nilesh rane, Sambhajiraje chhatrapati

    पुढील बातम्या