शेण खाल्ल्यानंतर मंत्री असल्याची लाज वाटत असेल तर...आदित्य ठाकरेंवर अत्यंत खोचक टीका

शेण खाल्ल्यानंतर मंत्री असल्याची लाज वाटत असेल तर...आदित्य ठाकरेंवर अत्यंत खोचक टीका

नारायण राणे यांचे सुपुत्र आणि भाजप नेता निलेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

  • Share this:

मुंबई, 2 सप्टेंबर: राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र आणि भाजप नेता निलेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. निलेश राणे यांनी बुधवारी ट्वीट करून राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली आहे.

हेही वाचा...अडीच वर्षाच्या चिमुकलीसह दाम्पत्यानं रेल्वेखाली झोकून दिलं, आई व मुलगी जागीच ठार

'शेण खाल्ल्यानंतर मंत्री असल्याची लाज वाटत असेल तर फक्त सोशल मीडियावर मंत्रिपदाचा उल्लेख पुसून काही होणार नाही... खरा पुरूष असशील तर राजीनामा दे आणि बाजूला हो.', अशा शब्दांत निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे.

आदित्य यांना वाचवण्यासाठी काँग्रेस नेत्यांना ठेवलं पगारी...

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी निलेश राणे यांनी राज्य सरकारवर हल्ला केला आहे. सरकारवर थेट आरोप करताना निलेश राणे म्हणाले की, आदित्य ठाकरे यांना वाचवण्यासाठी शिवसेनेनं काँग्रेस नेत्यांना पगारी ठेवलं आहे. त्यावर अद्याप काँग्रेस आणि शिवसेनेकडून कोणत्याही नेत्यानं प्रतिक्रिया दिलेली नाही.

आदित्य ठाकरे यांनी प्रोफाइलवरून 'मंत्री' शब्द हटवला!

दरम्यान, राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर प्रोफाइलवरून 'मंत्री' हा शब्द हटवला. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.

मात्र, दुसरीकडे, शिवसेनेने हे वृत्त फेटाळून लावलं आहे. शिवसेनेनं याबाबत म्हटलं की, आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर प्रोफाइलमध्ये कोणताही बदल केलेला नाही. आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर प्रोफाइलमध्ये 'महाराष्ट्र पर्यटन आणि पर्यावरण मंत्री' असं लिहिलंच नव्हतं असं, शिवसेनंनं म्हटलं आहे.

इंस्टाग्राम प्रोफाइलमध्ये 'मंत्री'

आदित्य ठाकरे यांनी मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांनी केवळ आपल्या इंस्टाग्राम प्रोफाइलमध्ये 'मंत्री' असा उल्लेख केला होता. आदित्य ठाकरे यांनी वर्षभरापासून आपल्या ट्विटर प्रोफाइलमध्ये कोणताही बदल केला नसल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे.

सुशांतसिंह प्रकरणात आदित्य यांचं नाव?

दरम्यान, बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह प्रकरणी आदित्य ठाकरे यांचं नाव वारंवार घेतलं जात आहे. विरोधी पक्ष भाजपचे नेते प्रत्यक्षपणे आदित्य ठाकरे याचं नाव घेत नसले तरी सरकारमधील युवा मंत्री म्हणून त्यांच्याकडेच बोट दाखवलं जात आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे मंत्रिपदाचा राजीनामा देता की काय, अशीही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे, आपला सुशांतसिंह प्रकरणाशी काही एक संबंध नसल्याचं आदित्य ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. त्यात सुशांत सिंहची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने देखील आपण आदित्य ठाकरेंना ओळखत नसल्याचं चौकशीत सांगितलं आहे.

हेही वाचा...टीव्ही रिपोर्टरने ऑक्सिजन अभावी गमावला जीव, पुण्यात कोरोनाचं धक्कादायक वास्तव

आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलं नाही...

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात भाजपच्या कोणत्याही नेत्याने प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलेलं नाही आहे, असं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

मात्र, गेली 40 दिवस जे खुलासे झाले नाहीत ते सीबीआयच्या तपासात समोर येत आहेत. मग सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करताना मुंबई पोलिसांवर कुणाचा दबाव होता? याचा तपास व्हायला हवा. हार्ड डिस्क नष्ट कुणी केल्या हे देखील समोर यायला हवं, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: September 2, 2020, 1:14 PM IST
Tags:

ताज्या बातम्या