मुंबई, 26 ऑक्टोबर: शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातल्या भाषणात भाजपवर जोरदार निशाणा साधला होता. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेनंतर भाजपचे नेते नारायण राणे यांच्या दोन्ही पुत्रांनी टीकेची तोफ डागली आहे. नारायण राणे यांची बेडकाशी तर त्यांच्या दोन्ही पुत्रांची बेडकाच्या पिलांशी तुलना केल्यानंतर आता निलेश राणे हे आक्रमक झाले आहेत. निलेश राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं आहे.
नेहमीप्रमाणे दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी फालतू आणि पोकळ भाषण केलं. मराठा व धनगर आरक्षणाबद्दल 1 वाक्य, पण बिहारवर 20 मिनिटं. उद्धव ठाकरे हे धमकी कोणाला देतायेत, आम्ही चॅलेंज देतो एका दिवसासाठी विसरा तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि होऊन जाऊ दे एकदा… तुमच्या धमक्यांना आम्ही फाट्यावर मारतो, अशा शब्दांत खोटक टीका करत निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं आहे.
नेहमीप्रमाणे दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी फालतू आणि पोकळ भाषण केलं. मराठा व धनगर आरक्षणाबद्दल १ वाक्य पण बिहारवर २० मिनिट. उद्धव ठाकरे धमकी कोणाला देता, आम्ही चॅलेंज देतो एका दिवसासाठी विसरा तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि होऊन जाऊ दे एकदा... तुमच्या धमक्यांना आम्ही फाट्यावर मारतो.
दरम्यान, राज्य सरकार व शिवसेनेवर टीका करणाऱ्या विरोधकांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दसरा मेळाव्यातून जोरदार प्रहार केला. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यापासून ते राज्यपाल भगतसिंह यांच्यावरही निशाणा साधला. विविध मुद्यांवर भाष्य करताना ठाकरे यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली होती.
मुलींवर अत्याचार करणारा श्रावणबाळ जन्माला घातला का?
'दुसऱ्यांची पिल्ल वाईट. मग यांनी काय त्या दिनोच्या खुशीत नशा करुन मुलींवर अत्याचार करणारा 'श्रवणबाळ' जन्माला घातला आहे का? इतकी खुमखुमी आहे ना मग ती Disha Salain ची केस मुंबई पोलिसांवर कुठला ही दबाव न टाकता निःपक्षपाती चौकशी करुन दया. मग कळेल श्रावणबाळ काय दिवे लावतो ते!, असं म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
दसरा मेळाव्यात काय म्हणाले उद्धव ठाकरे?
सरसंघचालक यांनी सांगितलेले हिंदुत्व मानता की नाही? सरसंघचालक सांगतात हिंदुत्व हे पूजेपर्यंत मर्यादित हिंदुत्व नाही, मंदिर उघडे करा म्हणतात. टोप्या नका घालू विनाकारण काहीही सांगून असा निशाणाही त्यांनी भाजपला लगावला.
आपल्या संपूर्ण भाषणात उद्धव ठाकरे यांनी भाजपला टार्गेट केलं. कंगणा राणौतवरही त्यांनी जोरदार टीका केली. मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणे हे पंतप्रधान मोदींचा अपमान आहे असंही ते म्हणाले.
सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी महाराष्ट्रावर, शिवसेनेवर, ठाकरे कुटुंबीयांवर जे आरोप केले ते महाराष्ट्राला बदनाम करणारं आहे. शेण खाऊन त्यांनी आमच्यावर गोमुत्राच्या गुळण्या केल्या तो सगळ्या जगाने पाहिलं असंही ते म्हणाले.
मुंबई, शिवाजी पार्क सगळीकडे चरस गांजा पिकला अस चित्र काही निर्माण केले, आमच्या घरासमोर तुळशीवृंदावन असते. गांजाची शेती तुमच्याकडे असते.मुंबई महाराष्ट्र पोलिस दल अभिमान आहे. केवळ महाराष्ट्र पुढे जातो म्हणून बदनाम केले जाते.
पाकव्याप्त हे जर देशात असेल तर पीएम यांचे पाप, आमचे पाप नाही. एकाने आत्महत्या केल्यानंतर बिहार पूत्र गेला म्हणून गळे काढले जात आहेत. गळे काढणारे महाराष्ट्र सरकार, ठाकरे कुटुंबीय, आदित्य यावर आरोप केले, गोमूत्र शेणाने गुळण्या केल्या नंतर काय झालं.
महाराष्ट्र द्वेष पसरवला जोतोय त्यामुळे सावध रहा. देश तोडण्याचा प्रयत्न होत आहेत. भाजपा हा मित्रपक्ष पण इमान नका राखू पण किमान मातीशी इमान राखा. अहंकारी राजा आणि कळसु्त्री बाहुल्यांचा खेळ येथे चालणार नाही. कोरोना संकट असताना केवळ पाडापाडी करून सरकार पाडण्याच काम होत असेल तर अराजक वाटचाल आहे.
मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देणार आहोत. त्याची त्यांनी काळजी करू नये. पण त्यावरून राज्यात फुट पाडण्याचं राजकारण यशस्वी होऊ देऊ नका असं आवाहनही त्यांनी केलं.