मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नवाब मलिक देशद्रोही व्यक्ती, नारायण राणेंची सडकून टीका

नवाब मलिक देशद्रोही व्यक्ती, नारायण राणेंची सडकून टीका

'कडवट हिंदुत्ववादी बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आज सत्तेसाठी लाचारी करत आहे. पदासाठी देशद्रोही लोकांचं समर्थन करत आहेत.

'कडवट हिंदुत्ववादी बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आज सत्तेसाठी लाचारी करत आहे. पदासाठी देशद्रोही लोकांचं समर्थन करत आहेत.

'कडवट हिंदुत्ववादी बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आज सत्तेसाठी लाचारी करत आहे. पदासाठी देशद्रोही लोकांचं समर्थन करत आहेत.

  • Published by:  sachin Salve

रायगड, 24 फेब्रुवारी : मनी लाँड्रिंग प्रकरणात (Money laundering case) राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik arrest) यांना अटक ईडीने अटक केली आहे. मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे मंत्र्यांनी निदर्शनं केली. पण 'एका देशद्रोही मंत्र्यासाठी सत्ताधारी पक्षाचे लोक आंदोलन करतात हे दुर्दैव आहे. अशांना या गादीवर बसण्याचा नैतिक अधिकार नाही' अशी टीका भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (naryan rane) यांनी केली.

केंद्रीय मंत्री नारायण राणे भराडी देवीच्या दर्शनाला आले होते. यावेळी च्यांनी सहकुटुंब देवीचे दर्शन घेतले. आई जवळ काय साकडे घातले असे विचारले असता राणे म्हणाले की, 'काही जण राणे कुटुंबीयांबाबत राजकारणात सूडबुद्धीने, आकसाने, द्वेषाने वागत आहेत त्यांना दिर्घ आयुष्यं दे' तसंच या सर्वांच्या विरोधात लढण्यासाठी आम्हाला बळ दे' असे साकडे घातल्याचे नारायण राणे यांनी सांगितलं.

'एका देशद्रोही मंत्र्यासाठी सत्ताधारी पक्षाचे लोक आंदोलन करतात हे दुर्दैव आहे. खरंतर या सरकारने राजीनामा दिला पाहिजे. कारणं एका देशद्रोही व्यक्तीला मंत्री म्हणून कॅबिनेटमध्ये घेतलं आहे आणि आज त्याच समर्थन करत आहेत. अशांना या गादीवर बसण्याचा नैतिक अधिकार नाही' असा टोला राणे यांनी शिवसेनेला लगावला.

'कडवट हिंदुत्ववादी बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आज सत्तेसाठी लाचारी करत आहे. पदासाठी देशद्रोही लोकांचं समर्थन करत आहेत. या पेक्षा वाईट गोष्ट नाही उपोषणाला बसले आहेत. उपोषणाला बसलेल्या सर्वांना देशद्रोह कायद्याखाली अटक केली पाहिजे, असंही यावेळी नारायण राणे म्हणाले

संजय राऊत यांना टोला

2024 मध्ये आमची सत्ता आली की तुम्हाला बघून घेऊ असे म्हणणारे हे तेच आहेत. पदासाठी लाचारी पत्कारून हिंदुत्वाचा त्याग करून सत्तेत गेले आहेत. आणि आता दिल्लीची सत्ता घेणार असे म्हणत आहेत. भाजपचे 301 खासदार आहेत. मोदींच्या आशीर्वादाने शिवसेनेचे 18 खासदार  निवडून आले. पुढच्या वेळी 5 पण येणार नाहीत केंद्राची स्वप्न पाहण्यापेक्षा राज्यातील घडामोडी बघा असा टोला नारायण राणे यांनी लगावला

First published:

Tags: नारायण राणे