काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीची माफी मागत भाजप नेत्याचा राजीनामा

काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीची माफी मागत भाजप नेत्याचा राजीनामा

मिरा भाईंदर मतदारसंघातील माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी आपण राजीनामा देत असल्याची घोषणा केली.

  • Share this:

मिरा भाईंदर, 24 फेब्रुवारी :  मिरा भाईंदरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. आपल्या पदाचा राजीनामा देत त्यांनी राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसचीही माफी मागितली आहे.

सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर भाजपने महाविकासआघाडी सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. तर दुसरीकडे भाजपमधील अंतर्गत कलहही समोर येत आहे.

मिरा भाईंदर मतदारसंघातील माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी आपण राजीनामा देत असल्याची घोषणा केली. आता या क्षणापासून मी भाजपाच्या सर्व पदांचा आणि जबाबदारीचा राजीनामा देतोय. मी हृद्यापासून सर्वांचे धन्यवाद मानतो ज्यांनी मला नेहमी मदत केलीये माझ्या सोबत राहिलेत, असं म्हणत त्यांनी आपण राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं.

तसंच, 'मी भाजपाच्या सर्व वरीष्ठ पदाधिकाऱ्यांची आणि तसंच महाराष्ट्रातील तसंच मिराभाईंदर मधील सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते ( काँग्रेस, शिवसेना, एनसीपी इतर ) यांची माफी मागतो, असंही मेहता म्हणाले. विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मेहता पराभूत झाले होते.गीता जैन यांनी त्यांचा पराभव केला होता.

 स्थायी समितीच्या सदस्य निवडीवरून राडा, भाजपतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर

दरम्यान, महापालिकेच्या स्थायी समितीच्या आठ सदस्य निवडीवरून भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षात आज राडा झाला. सत्ता आणि पद याचा वाद वाढल्याने भाजपातील अंतर्गत कलह आज चव्हाट्यावर आला.

नाशिक महापालिकेमध्ये आज अभुतपूर्व गोंधळ पाहण्यास मिळाला.  भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यानं नगरसेविका प्रियांका घाटे यांच्या समर्थकांनी गोंधक घालत पक्षाकडे राजीनामा दिला तर शिवसेनेत पूनम मोगरे यांना संधी न मिळाल्याने त्यांच्याही सदस्यांनी गोंधळ घातला.

स्थायी समितीचे आठ सदस्य 29 फेब्रुवारीला निवृत्त होत असून त्यांच्या जागी 8 नवे सदस्य नियुक्त करण्यासाठी विशेष महासभा आज महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली खाली झाली. यावेळी भाजपकडून हेमंत शेट्टी, सुप्रिया खोडे, वर्षा भालेराव, शिवसेनेकडून सत्यभामा गाडेकर आणि सुधाकर बडगुजर तर काँग्रेसकडून राहुल दिवे तसंच राष्ट्रवादीकडून समीना मेमन यांच्या नावांची घोषणा केली. मात्र, संख्याबळाच्या आधारावर 3 सदस्य असावे या मागणीवर शिवसेना आग्रही होती. आता नाराज शिवसेना,या निवडीला कोर्टात खेचणार आहे.

उमेदवारी न मिळाल्याने प्रियांका घाटे यांच्या समर्थकांनी सभागृहाबाहेर गोंधळ घालत विशिष्ट समाजाला डावलले जात असल्याचा आरोप केला. दरम्यान, या गोंधळामुळे महापौर सतीश कुलकर्णी यांनी सदस्य नियुक्त केले आणि तत्काळ सभा संपविली. यानंतर घाटे समर्थक रामायण या महापौर निवासस्थानी ठाण मांडून बसले.

अखेर महापौर सतीश कुलकर्णी यांनी प्रियांका यांच्या सोबत चर्चा केली. त्यांची नाराजी तात्पुरती दूर करण्यात त्यांना यश मिळालं असलं तरी पुन्हा हा संघर्ष पेटणार हे नक्की.

सत्ता म्हटलं की पद आलं, पद आलं की इच्छुकांनी संख्याही वाढते.आणि पद नाही मिळालं की, नाराजी ही आलीच. आता याच नाराजीचा फटका सत्ताधारी भाजपला बसणार का ? या नाराजांसोबत चर्चा करून पुन्हा योग्य समन्वय साधला जाणार का? हे प्रश्न आज जरी अनुत्तरीत असले तरी, सत्ताधारी भाजपला आज त्यांच्याच शिलेदारांनी जेरीस आणलं हे नक्की. आता याचाच फायदा विरोधक कसा घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 24, 2020 07:39 PM IST

ताज्या बातम्या