'नाचता येईना आंगण वाकडं' अशीच सरकारची अवस्था, नारायण राणेंची सणसणीत टीका

'नाचता येईना आंगण वाकडं' अशीच सरकारची अवस्था, नारायण राणेंची सणसणीत टीका

आगामी काळात हेच मंत्री स्वतःच्या जेवणाचा खर्चही केंद्रानं द्यावा अशी मागणी करतील

  • Share this:

मुंबई, 18 नोव्हेंबर: भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर सणसणीत टीका केली आहे.

राज्य सरकारचा प्रत्येक मंत्री केंद्र सरकारकडे आर्थिक मदत मागत आहे. मदत मिळाली नाही तर टीका करत आहे. थोडक्यात या सरकारची अवस्था 'नाचता येईना आंगण वाकडं' अशी झाली आहे. आगामी काळात हेच मंत्री स्वतःच्या जेवणाचा खर्चही केंद्रानं द्यावा अशी मागणी करतील, असा खोचक टोला भाजपचे खासदार नारायण राणे यांची ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचं नाव न घेता लगावला आहे.

हेही वाचा...सबसिडी नसणाऱ्या LPG गॅस सिलेंडरवर मिळवा सवलत, अशाप्रकारे करा बुकिंग

वीज बिलात सवलत देण्याची भाषा करणाऱ्या राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आता आपला शब्द फिरवला आहे. याविरोधात भाजप नेते पुन्हा आक्रमक झाले आहेत. 'जेवढं बिल आलेलं आहे, तेवढं बिल ग्राहकांना भरावं लागेल', असं वक्तव्य ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलं आहे. त्यामुळे नितीन राऊत यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

...तर रस्त्यावर उतरेन, एकनाथ खडसेंच्या सूनबाईंचा इशारा

वीज ग्राहकांना दिलासा देण्याची गरज आहे. मात्र, सरकारनं याबाबत योग्य भूमिका न घेतल्यास जनहितासाठी भाजप रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा भाजप खासदार रक्षा खडसे यांनी दिला आहे.

खासदार रक्षा खडसे म्हणाल्या, 'जेवढं बिल आलेलं आहे, तेवढं बिल ग्राहकांना भरावं लागेल', असं वक्तव्य ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलं आहे. ऊर्जामंत्र्यांचं वक्तव्य सपशेल चुकीचं आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं बिल माफ करू, असं राज्यातील जनतेला आश्वासन दिलं होतं. मात्र नितीन राऊत हे एक चांगले नेते आहे. त्यांनी आपला शब्द फिरवायला नको होता. संपूर्ण वीज बिल माफ करू शकले नसले तरी काही प्रमाणात ग्राहकांना सवलत द्यायला हवी, अशी मागणी खासदार रक्षा खडसे यांनी यावेळी केली आहे.

हेही वाचा...ठाकरे सरकार गोंधळलेले, पाडण्याच्या भानगडीत आम्ही पडणार नाही – चंद्रकांत पाटील

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून भाजपला सातत्याने आंदोलन करण्याची गरज पडत आहे. कारण भाजप ही वैयक्तिक फायद्यासाठी नसून जनतेच्या हितासाठी आंदोलन करत आहेत, असं खासदार रक्षा खडसे यांनी सांगितलं.

Published by: Sandip Parolekar
First published: November 18, 2020, 4:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading