'सरकार पाडून दाखवा...' उद्धव ठाकरेंच्या आव्हानावर नारायण राणेंकडून जोरदार प्रत्युत्तर

'सरकार पाडून दाखवा...' उद्धव ठाकरेंच्या आव्हानावर नारायण राणेंकडून जोरदार प्रत्युत्तर

सिंधुदुर्ग इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवरून नारायण राणे यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं.

  • Share this:

दिनेश केळुसकर, 18 फेब्रुवारी : 'सरकार पाडायचं असेल तेव्हा भाजपा पाडेल, त्यासाठी उध्दव ठाकरेंच्या आव्हानाची गरज नाही,' असं म्हणत भाजपचे नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. सिंधुदुर्ग इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवरून नारायण राणे यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं.

'रिफायनरी महाराष्ट्राच्या बाहेर जात असेल तर दोन गोष्टीचा विचार करावा. पैसा महत्वाचा की जनतेचं जीवन महत्बाच ते ठरवावं. हिम्मत असेल तर रिफायनरी येणार नाही, असा ठराव उध्दव ठाकरे यांनी कॅबिनेटमध्ये करावा,' असं आव्हान नारायण राणे यांनी दिलं आहे. तसंच मुख्यमंत्र्यांना शिवाजी राजेंबद्दल आस्था असेल तर 'शिवाजीचं उदात्तीकरण' या पुस्तकावर बंदी घालावी, अशी मागणी नारायण राणे यांनी केली आहे.

'एल्गारचा तपास NIA कडे देणं संशयास्पद....' थोरात यांचं धक्कादायक विधान

शिवसेना आणि भाजप सत्तास्थापनेसाठी पुन्हा एकत्र येणार का, अशी चर्चा अधून-मधून वर येत असते. त्याबाबत बोलताना नारायण राणे यांनी मनोहर जोशी यांना टोला लगावला आहे. 'शिवसेना भाजपा पुन्हा एकत्र येतील का हे जोशी सरच सांगू शकतील,' असं राणे म्हणाले.

सरकार पाडण्यावरून ठाकरे-फडणवीसांमध्ये कलगीतुरा

'तुमच्यात हिंमत असेल तर पुन्हा निवडणूक लढू. आम्ही एकटे असलो तरी तुम्हा तिघांना पुरुन उरू,' असं म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं होतं. आम्ही सरकार खाली खेचणार नाही, पण तुमची हिंमत असेल तर चला पुन्हा लोकांच्या कोर्टात, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

First published: February 18, 2020, 5:29 PM IST

ताज्या बातम्या