मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नारायण राणेंचं एक पाऊल पुढे... सांगून टाकलं ठाकरे सरकार कोसळल्यानंतर काय होणार ते

नारायण राणेंचं एक पाऊल पुढे... सांगून टाकलं ठाकरे सरकार कोसळल्यानंतर काय होणार ते

शिवसेना- काँग्रेस- राष्ट्रवादी समीकरण होऊ शकतं तर राज्यात कोणतंही समीकरण होऊ शकतं

शिवसेना- काँग्रेस- राष्ट्रवादी समीकरण होऊ शकतं तर राज्यात कोणतंही समीकरण होऊ शकतं

शिवसेना- काँग्रेस- राष्ट्रवादी समीकरण होऊ शकतं तर राज्यात कोणतंही समीकरण होऊ शकतं

  • Published by:  Sandip Parolekar

मुंबई, 27 नोव्हेंबर: राज्यात महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aaghadi) स्थापन होऊन एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार त्यांच्यातील अंतर्गत वादामुळेच कोसळेल, असा पाढाच विरोधकांनी लावला आहे. सरकार स्थापनेपासून त्याचा स्थैर्यावर भाजपनं सातत्यानं प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

भाजपचे  खासदार नारायण राणे (BJP Leader Narayan Rane) यांनी एक पाऊल पुढे टाकत राज्यातील सरकार कोसळल्यानंतर काय होणार? हे देखील सांगून टाकलं आहे. भाजपचे राज्यसभा सदस्य नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेसह महाविकास आघाडीवरही टिकास्त्र दागले आहे.

हेही वाचा...महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ, बंडखोर नेत्याची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी

नारायण राणे म्हणाले, सत्तेत असणारं सरकार महाराष्ट्रासाठी पोषक नाही. त्यामुळे हे सरकार कोसळणार आहे. सरकार कोसळल्यानंतर काय होणार, असं म्हणत नारायण राणे यांनी दोन फॉर्म्युले देखील सुचवले आहेत.

महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर इतर दोन पक्षांपैकी एका पक्षासोबत भाजपची युती होऊ शकते. किंवा राज्यात पुन्हा राष्ट्रपती राजवट लागू शकते, असे दोन पर्याय नारायण राणे यांनी सुचवले आहेत. तसेच राज्यात पुन्हा निवडणुका होण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असं राणे यांनी यावेळी सांगितलं. शिवसेना- काँग्रेस- राष्ट्रवादी समीकरण होऊ शकतं तर राज्यात कोणतंही समीकरण होऊ शकतं, असे संकेतही नारायण राणे यांनी यावेळी दिले आहेत.

मातोश्रीच्या आतली आणि बाहेरची सर्व गुपिते समोर आणू...

नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदी-शहांवर सूड उगवण्याची भाषा करण्याआधी हिम्मत असेल तर आम्हाला भिडावं आम्ही समर्थ आहोत. मातोश्रीच्या आतली आणि बाहेरची सर्व गुपिते काढू आणि ते थोड्याच दिवसांत कळेल, असं थेट आव्हान नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिलं आहे. सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दैनिक सामनाला दिलेल्या मुलाखतीत तुम्ही एक सूड काढाल तर आम्ही दहा काढू, असा इशारा भाजपला दिला. त्यावर बोलताना नारायण राणे यांनी उद्धव यांच्या या मुलाखतीतवर सडकून टीका केली. हे सरकार जनतेचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले आहे. असा पुनरुच्चारही त्यांनी केला.

हेही वाचा.. एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाचा उल्लेख करत अजित पवारांनी साधला भाजपवर निशाणा

सहा महिन्यात काढलं 65 हजार कोटींचं कर्ज

नारायण राणे म्हणाले, या सरकारनं गेल्या सहा महिन्यात 65 हजार कोटींचं कर्ज काढलं आहे. त्यामुळे राज्य दिवाळखोरीत गेलं आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याला उद्धव ठाकरे यांच्यासारखा मुख्यमंत्री मिळाला हे दुर्दैव आहे, अशी टीका देखील नारायण राणे यांनी केली.

First published:

Tags: BJP, Devendra Fadnavis, Maharashtra, Narayan rane, Shiv sena, Udhav thackeray