उद्धव ठाकरे हिंदुत्त्व विचारसरणीचे नाहीतच, नारायण राणेंचा घणाघाती 'प्रहार'

उद्धव ठाकरे हिंदुत्त्व विचारसरणीचे नाहीतच, नारायण राणेंचा घणाघाती 'प्रहार'

उद्धव ठाकरे यांनी भाजपशी गद्दारी करून ते मुख्यमंत्रिपदावर बसले

  • Share this:

मुंबई, 18 नोव्हेंबर: उद्धव ठाकरे यांनी भाजपशी गद्दारी करून ते मुख्यमंत्रिपदावर बसले आहे. हिंदु धर्माच्या विरोधात जाऊन त्यांनी काँग्रस- राष्ट्रवादीशी घरोबा केला. मुख्यमंत्र्यांनी एका वर्षात काहीच काम केलं नाही. पिंजऱ्यात बसून राहतात. शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदासाठी हिंदुत्त्व सोडलं. त्यांच्याकडून काय अपेक्षा धरणार, अशी घणाघाती टीका भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केली आहे.

नारायण राणे म्हणाले, उद्धव ठाकरे कोणत्याही परीक्षेला बसत नाही, पास होत नाही. त्यामुळे प्रमाणपत्र देण्याची गरज नाही, असं शिवसेना नेते कायम म्हणतात. शिवसेना हिंदुत्त्ववादी पक्ष नाही, उद्धव ठाकरे हिंदुत्त्व विचारसरणीचे नाही, पदासाठी ते तडजोड करणारे आहेत, असाही टोला नारायण राणे यांनी यावेळी लगावला.

हेही वाचा...राम कदमांच्या अटकेनंतर भडकले भाजप नेते; म्हणाले.. ठाकरे सरकारची जुलमी राजवट!

पालघरमधील साधुंच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवावा, या मागणीसाठी भाजप आमदार राम कदम यांच्याकडून खार ते गडचिंचले असा 'जनआक्रोश मोर्चा' काढणार होते. मात्र, मोर्चाला परवानगी नाकारत पोलिसांनी राम कदम यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर काही वेळातच राम कदम यांची सुटका करण्यात आली. त्यानंतर नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांनी खार पोलीस स्टेशनला जाऊन राम कदम यांची भेट घेतली. शिवसेनेसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली.

हिंदुस्तान साधुसंताचा देश आहे. साधुसंतावर अन्याय होऊ नये, यासाठी राम कदम यांनी आंदोलन छेडलं होतं. पालघरचा तपास सीबीआयकडे जायला हवा, महराष्ट्रात जे सरकार बसलं आहे, त्यांची साधुंना न्या देण्याची इच्छा नाही, असं नारायण राणे यांनी सांगितलं. त्यामुळे राम कदम यांना आंदोलन करावं लागलं. 212 दिवस होऊनही पालघरचा तपास पूर्ण होत नाही, त्याला विरोध करण्यासठी भाजप आमदार राम कदम यांनी जनआक्रोश मोर्चा काढणार होते, असंही राणेंनी सांगितलं.

सुटकेनंतर काय म्हणाले राम कदम...?

महाराष्ट्र सरकार हे धुतराष्ट्राच्या भूमिकेत आहे. पालघरमध्ये साधुंच्या हत्येला एवढे दिवस झाले तरी कारवाई नाही, हत्येवेळी राष्ट्रवादीचे काही नेते उपस्थित होते, घटनेच्या चौकशीआधीच महाराष्ट्र सरकारनं मॉब लिचिंग असल्याचं घोषित केलं. सरकारला हा तपास सीबीआयला सोपवावा लागेल. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संतांवर अन्याय सहन करणार नाही, हे सरकारनं लक्षात ठेवावं, असा इशारा देखील राम कदम यांनी यावेळी दिला आहे.

काय आहे प्रकरण?

कांदिवली येथील सुशीलगिरी महाराज, वाहन चालक निलेश तेलगडे आणि नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील दक्षिण मुखी हनुमान मंदिराचे पुजारी कल्पवृक्षगिरी महाराज हे लॉकडाउनच्या काळात गुजरातकडे चालले होते. चालकाची त्यांच्याकडे प्रवासाठीचा कोणताही पास नसल्याने त्यांना चारोटी टोलनाका येथून पोलिसांनी माघारी पाठवले. म्हणून ते माघारी फिरून आड मार्गाने विक्रमगडहून जव्हार-दाभाडीमार्गे दादरा नगर हवेलीच्या हद्दीवर असलेल्या डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास पोहचले. मात्र, त्याठिकाणी वनविभागाच्या चौकीजवळ जमलेल्या एका जमावाने या तिघांची गाडी अडवली आणि चोर समजून दगड, कोयते, काठ्यांनी मारण्यास सुरूवात केली.

हेही वाचा...घरातून बाहेर पडताच भाजप आमदार राम कदम यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

जमावानं त्यांची कारही पलटी केली. गार्डने प्रसंगावधान राखून पोलिसांना सूचना दिली. रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास पोलीस आपल्या गाडीसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या तिघा जखमींना कारमध्ये बसवून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, जमाव शेकडोंच्या संख्येने असल्याने तिथं उपस्थित चार पोलिसांचे काहीच चालले नाही. जमाव अधिकच आक्रमक झाला आणि त्यांनी थेट पोलिसांवरही हल्ला चढवला. या घटनेतून पोलिसांनी कशीबशी आपली सुटका करून घेतली. मात्र, त्या तीन जणांची जमावाने दगड, काठ्या, कोयत्याने वार करुन निर्घृणपणे हत्या केली. या घटनेचे देशभरात तीव्र पडसाद उमटले होते.

Published by: Sandip Parolekar
First published: November 18, 2020, 1:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading