शरद पवारांवर भाजप नेत्याची विखारी टीका

शरद पवारांवर भाजप नेत्याची विखारी टीका

माधव भांडारी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खरमरीत टीका केली आहे.

  • Share this:

मुंबई, 13 फेब्रुवारी : भारतीय जनता पक्षानेच व्हीआयपी संस्कृती मोडीत काढली. त्यामुळे सत्तेसाठी भुकेलेल्या शरद पवारांनी उसनं अवसान आणू नये, असं म्हणत भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खरमरीत टीका केली आहे.

'राज्यात भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर पोलिसांनी सलाम करण्याची पद्धत राज्याचे तत्कालिन सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि विद्यमान भाजप प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बंद करायला लावली. तशा सूचना त्यांनी सर्वांना दिल्या होत्या. त्याचप्रमाणे तत्कालीन मुख्यमंत्री आणि राज्याचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांनी ही व्हीआयपी संस्कृती मोडीत काढण्याचा निर्णय घेतला आणि तो अंमलातही आणला,' असं म्हणत माधव भांडारी यांनी शरद पवारांना लक्ष्य केलं आहे.

'लोकप्रतिनिधी हे जनतेचे सेवक असल्याने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील लाल दिव्याची संस्कृती बंद केली होती. त्यामुळे पवार साहेबांनी उसने अवसान आणू नये,' असंही माधव भांडारी म्हणाले.

शरद पवारांवर कोणत्या मुद्द्यावरून भाजपने केली टीका?

सभा शांततेत शुरू असताना महिला पोलीस कर्मचारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार बसण्यासाठी खुर्ची अथवा आसन उपलब्ध करून देण्याविषयक संयोजकांना मार्गदर्शक सूचना निर्गमित व्हाव्यात व पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांना गृहविभागामार्फत तशी मुभा असावी अशी विनंती करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिले आहे.

स्व. गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या रौप्यमहोत्सवी सांगता समारंभानिमित्त मिरजमधील गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलात आयोजित कार्यक्रमात उपस्थितांशी शरद पवार यांनी संवाद साधला. त्यानंतर शरद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र दिले आहे.

यावेळी राज्यातील मंत्री, अतिमहत्त्वाच्या व्यक्ती यांच्या दौऱ्याप्रसंगी गर्दी नियंत्रण, कायदा-सुव्यवस्था आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने तैनात असलेल्या पोलिसांच्या प्रश्नांकडे आयोजकांचे आणि उपस्थितांचे शरद पवार यांनी लक्ष वेधले. या मुद्द्यावरूनच भाजपने त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

First published: February 13, 2020, 9:57 PM IST

ताज्या बातम्या