'फक्त पैसे मिळवण्यासाठी भूमिका करत आहेत', भाजप नेत्याचं अमोल कोल्हेंवर टीकास्त्र

'फक्त पैसे मिळवण्यासाठी भूमिका करत आहेत', भाजप नेत्याचं अमोल कोल्हेंवर टीकास्त्र

'अमोल कोल्हेंची जी भूमिका सुरू आहे ती फक्त पैसे मिळविण्यासाठी सुरू आहे.'

  • Share this:

राजगुरुनगर, 18 सप्टेंबर : 'खासदार अमोल कोल्हे हे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची भूमिका करतात आणि या भूमिकेचे त्यांना पैसे मिळतात. त्यामुळे सध्याची डॉ. अमोल कोल्हेंची जी भूमिका सुरू आहे ती फक्त पैसे मिळविण्यासाठी सुरू आहे. अमोल कोल्हे हे भगव्याशी प्रामाणिक नाहीत, असा हल्लाबोल भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केला आहे.

'अमोल कोल्हेंना जर त्या भूमिकेशी बांधिलकी असती तर राष्ट्रवादी कॉग्रेसच्या यात्रेत भगवा झेंडा लावू नको, असं ज्यावेळी सांगितलं त्याचवेळी भगव्या झेंड्याचा मान राखण्यासाठी ते पक्षातून बाहेर पडले असते. मात्र यांची भगव्या झेंड्याशी बांधिलकी राहिली नाही, यांची छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी बांधिलकी राहिली नाही, यांची बांधिलकी कशाशी आहे हे आता जनतेनेच ओळखा,' असं म्हणत माधव भंडारी यांनी अमोल कोल्हेंवर जोरदार टीका केली आहे. माधव भंडारी हे राजगुरुनगर येथील विजय संकल्प बूथ मेळाव्यात बोलत होते.

शरद पवारांनाही केलं टार्गेट

भाजपमध्ये सुरू असलेल्या मेगाभरतीवर सध्या जोरदार टीका करण्यात येत आहे. माधव भंडारी यांनी विरोधकांच्या या टीकेला प्रत्युत्तर देत पलटवार केला आहे. 'टिका करणारांचा पक्ष मोडीत निघाला असून फक्त बाप-लेकापुरता शिल्लक राहिला आहे. त्याचं दु:ख जास्त झाल्याने भाजपवर टीका करायला सुरुवात केली आहे. पण गेल्या वीस वर्षात पवारसाहेबांनीच महाराष्ट्रात फोडफोडीचे राजकारण केलं आहे. त्यामुळे त्यांना टीका करण्याचा आधिकार नसल्याचं माधव भंडारी यांनी म्हटलं आहे.

SPECIAL REPORT: नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशानंतर युती तुटणार का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 18, 2019 04:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading