जयसिद्धेश्वर स्वामींची खासदारकी धोक्यात येताच निवडणूक लढवण्यासाठी भाजप नेत्याने थोपटले दंड

जयसिद्धेश्वर स्वामींची खासदारकी धोक्यात येताच निवडणूक लढवण्यासाठी भाजप नेत्याने थोपटले दंड

सोलापूरमध्ये लोकसभा पोटनिवडणुकीची शक्यता वर्तवण्यात येत असून जिल्ह्यातील राजकारणाला वेग आला आहे.

  • Share this:

पंढरपूर, 24 फेब्रुवारी : भाजपचे सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याने त्यांची खासदारकी धोक्यात आली आहे. त्यामुळे सोलापूरमध्ये लोकसभा पोटनिवडणुकीची शक्यता वर्तवण्यात येत असून जिल्ह्यातील राजकारणाला वेग आला आहे. अशातच भाजप नेते आणि माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत.

'पक्षाने आदेश दिल्यास आपण सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढू,' असं म्हणत माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी आपण ही निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं दाखवून दिलं आहे. पंढरपूरात उद्या सर्व जाती, धर्मातील संत आणि धर्मगुरूंच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे. एनआरसी आणि सीएएबाबत या मेळाव्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि लक्ष्मण ढोबळे मार्गदर्शन करणार आहेत.

'देशात एनआरसी आणि सीएएबाबत जे सध्या वातवरण सुरू आहे. त्यामध्ये असलेला संभ्रम दूर करण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे. मात्र जयसिध्देश्ववर स्वामी यांचे जात प्रमाणपत्र रद्द झाले असेल तर सोलापूर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुक होईल, ही शक्यता लक्षात घेऊन पक्षाने आदेश दिल्यास निवडणूक लढू, असं ढोबळे म्हणाले.

दरम्यान, जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या बाबतच्या बातमीने महाराष्ट्र भाजपच्या गोटात चिंता वाढवली आहे. सोलापूरचे भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांची खासदारकीच धोक्यात येऊ शकते. त्यांनी दिलेलं जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय जात पडताळणी समितीने घेतला आहे. लोकसभा निवडणुकीत दिग्गजांना हरवून विजय मिळवणाऱ्या लिंगायत समाजातील आदरणीय गुरू असणाऱ्या जयसिद्धेश्वर स्वामी यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

ठाकरे सरकारची वचनपूर्ती: कर्जमाफ झालेल्या शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या जात प्रमाणपत्राबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यावर जात पडताळणी समितीचा निर्णय आज आला आणि समितीने जयसिद्धेश्वर स्वामींच्या जातीचं प्रमाणपत्र रद्द केलं, जयसिद्धेश्वर स्वामी यांनी सोलापुरातून लोकसभेची निवडणूक लढताना वंचित विकास आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांच्यासारख्यांचा पराभव केला होता.

जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी उमेदवारी अर्जाबरोबर बेडा जंगम जातीचा दाखला सादर केला होता. पण हे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप करत तक्रार दाखल करण्यात आली होती. जयसिद्धेश्वर स्वामी यांच्याविरुद्ध प्रमोद गायकवाड, मिलिंद मुळे आणि विनायक कंडकुरे यांनी तक्रार दाखल केली होती. हिंदू लिंगायत जात असताना बेडा जंगम जातीचा दाखला दिल्याचा आरोप त्यांनी यामध्ये केला होता. याप्रकरणाचा अहवाल सादर करण्यात आला. यामध्ये जयसिद्धेश्वर स्वामी यांनी पुरावा म्हणून दिलेला दाखला संशयास्पद असल्याचं नमूद करण्यात आलं.

First published: February 24, 2020, 4:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading